Storm Damage: खानदेशात वादळी पावसासह गारपिटीने पीकहानी सुरूच आहे. या आठवड्यात सोमवारपासून (ता. ३०) जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत गारपीट व वादळी पाऊस होत आहे. यात केळी, कांदा, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १२ हजार हेक्टरला तडाखा बसला आहे. .जळगाव जिल्ह्यात वादळात सुरुवातीला साडेतीन हजार हेक्टरला फटका बसला होता. खानदेशात या आठवड्यात वादळी पाऊस, गारपिटीचे सत्र सुरूच आहे. सोमवारनंतर बुधवारी (ता. १) सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, एरंडोल धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात वादळी पाऊस व गारपीटही झाली. बुधवारी दुपारपर्यंत ऊन होते. परंतु सायंकाळी चारनंतर ढगांची जमवाजमव झाली..Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना.विजांचा चमचमाट सुरू झाला. सुसाट वारा व नंतर वेगवान वारा अशी स्थिती झाली. पाऊस व गारपीटही अनेक भागात झाली. यामुळे केळी, मका, कलिंगड, कांदा व अन्य भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द, फुपनगरी, कानळदा या भागात काही मिनीटे गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. सलग दोन वेळेस या भागांतील शिवारात गारपीट व वादळी पाऊस या आठवड्यात झाला आहे..एरंडोल तालुक्यात सोमवारी (ता. ३०) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे पाच हजार १७ हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश आमदार अमोल पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत..Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका.सहा हजार हेक्टरला फटकाबुधवारच्या गारपीट, वादळी पावसात खानदेशात सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली असून एकूण नऊ ते १० हजार हेक्टरला खानदेशात वादळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पण रोज वादळी पाऊस येत असल्याने नुकसान पातळी व याची आकडेवारी वाढत आहे. यामुळे पंचनामे प्रक्रियादेखील पुढेही सुरूच राहील, असे दिसत आहे..केळीची अधिक हानीजळगाव भागात केळीची मोठी हानी झाली आहे. लहान केळीची पाने पूर्णतः फाटून नुकसान झाले आहे. तर मोठी केळी भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, शेतकरी संकटात सापडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.