शेतकऱ्यांकडून भात, बाजरी, मका आणि नाचणीची थेट हमीभावात खरेदीगुजरात सरकारचा निर्णय, दोन महिने खुली राहणार खरेदी केंद्रप्रतिहेक्टरी खरेदीचे प्रमाण शेतमालांनुसार निश्चित .Kharif procurement: शेतकऱ्यांची आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गुजरात सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने भात, बाजरी आणि इतर शेतमालांची किमान आधारभूत किमतीत (MSP) खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. कृषिमंत्री जितूभाई वाघानी यांनी ही घोषणा केली आहे. २०२५-२६ च्या खरीप विपणन हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका आणि नाचणीची शेतकऱ्याकडून थेट खरेदी करण्यात येईल. ही खरेदी २४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले..गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नुकतेच अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. आता, त्यांच्या सरकारने शेतकरी कल्याणाला प्राधान्य देत, किमान आधारभूत किमतीत शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे..Kharif Procurement: धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, उडदाची हमीभावाने खरेदी सुरू.शेतकऱ्यांकडून प्रतिहेक्टर १,५०० किलो या प्रमाणात भाताची खरेदी केले जाईल, असे कृषिमंत्री वाघानी यांनी म्हटले आहे. राज्यात भात खरेदीसाठी ११३ खरेदी केंद्रे असतील. तर इतर शेतमालांच्या खरेदीसाठी वेगळी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. बाजरी पिकासाठी १५० केंद्रे, ज्वारीसाठी ५० केंद्रे, मका खरेदीसाठी ८२ केंद्रे आणि नाचणीसाठी १९ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रावर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत खरेदी प्रक्रिया सुरु राहणार आहे..Kharif Prices Crash: स्वतःच्या राज्यात भाव नाही; शेजारील राज्यात जाऊन शेतमाल विक्री, मग अटक अन् माल जप्त....शेतमालानुसार किमान आधारभूत किंमतप्रतिहेक्टर खरेदीचे प्रमाण शेतमालांनुसार निश्चित करण्यात आले आहे. बाजरीसाठी प्रतिहेक्टरी १,८४८ किलो, ज्वारीसाठी १,५३९ किलो, मक्यासाठी १८६४ किलो आणि नाचणीसाठी ९०३ किलो असे प्रमाणत निश्चित केले आहे. भातासाठी प्रतिक्विंटल २,३६९ ते २,३८९ रुपये, बाजरी ३,०७५ रुपये, ज्वारी (हायब्रिड) साठी ३,९९९ रुपये, ज्वारी (मालदांडी) साठी ४,०४९ रुपये, मका पिकासाठी २,४०० रुपये आणि नाचणीसाठी प्रतिक्विंटल ५,१८६ रुपये अशी किमान आधारभूत किंमत (MSP) दिली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.