Satara News : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई व माण तालुक्यांतील ४२०४ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधितांना नव्या दराप्रमाणे आठ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असून, निधी येताच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल. एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे..जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील अतिवृष्टी व नुकसानभरपाईचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते..सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत कोरेगाव, माण, खटाव व सातारा तालुक्यांतील एकूण २९४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. या नुकसानीपोटी तहसीलस्तरावरून निधी वितरण झाला आहे. खटाव तालुक्यातील मृत व्यक्तीच्या वारसाला चार लाख मदतीचे वाटप झाले आहे. मृत पशुधनाची संख्या चार असून, ३६ दुकाने बाधित आहेत..Crop Damage Compensation : ‘दौरे बंद करून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करा’.यांच्यासाठीही तहसीलस्तरावरून मदत वाटप सुरू आहे. कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई व माण तालुक्यांतील एकूण ४२०४ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नव्या दराप्रमाणे आठ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे..अतिवृष्टीत रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या दुरुस्तीचा ४६८ कोटी २४ लाखांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्ररीत्या पाठविला आहे. एक जून ते ३१ ऑगस्ट झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हा परिषदेच्या विविध इमारतींचे यामध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, विविध कार्यालये, रस्ते, साकव, पाण्याच्या योजनांचे २२५ कोटी ४४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. .Crop Damage : अचूक नुकसानीसाठी वाढीव पीक कापणी प्रयोग.एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे १४९ कोटी १४ लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे अतिवृष्टीत एकूण ३६४ कोटी ५८ लाखांहून अधिक रकमेचे जिल्हा परिषद यंत्रणेचे नुकसान झाले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडील ७६ लाखांहून अधिक जाळी, बोटी, मत्स्य बीज, मत्स्यसाठा आदींचे नुकसान झाले आहे..‘ॲग्रीस्टॅक नोंदीमुळे मदत तातडीने मिळेल’जलसंधारण विभागाकडील पाझर तलाव, लघू प्रकल्पांचे दोन कोटी ८७ लाख, जलसंपदा विभागाकडील कालवा, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे चार कोटी ३८ लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत सहजरित्या मिळावी, यासाठी ॲग्रीस्टॅकवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. ही नोंदणी अँड्राइड मोबाइलद्वारे स्वतः करावी किंवा महसूल, कृषी व आपले सेवा केंद्राच्या माध्यमातून करावी. ॲग्रीस्टॅक नोंदीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळेल, असे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.