Satara News : आता पावसाने उघडीप दिली असल्याने, महसूलसह कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा सर्वच यंत्रणांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या फिल्डवर जाऊन तत्काळ पंचनामे करावेत. कृषीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर जाऊन छायाचित्रे घेत वस्तुनिष्ठ पंचनामे करा..या नुकसानीचा परिपूर्ण अहवाल शासनास केला जाईल. आवश्यक निधी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रयत्न केले जातील, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नुकसानीबाबत पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक शनिवारी झाली. .Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.या वेळी खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते..पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाईत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती, दुकाने, घरे, रस्ते, पूल, सार्वजनिक मालमत्ता, विद्युत यंत्रणांची मोठी हानी झाली आहे. नुकसान झालेल्या घटकांच्या दुरुस्तीसाठी अथवा पुन्हा भारणीसाठी निकषानुसार मिळणारा निधी कमी पडत असल्यास सर्व लोकप्रतिनिधी मिळून अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू. जिल्हा प्रशासनाचा परिपूर्ण अहवाल सर्व मंत्री व आमदारांना दाखवण्यात येईल.’’.मकरंद पाटील म्हणाले, की मे महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला आहे. या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ अहवाल करून सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याला साधारणत: ८ कोटींची नुकसान भरपाई निधी देण्यात आला आहे..Crop Damage Survey : पंचनाम्यास विरोध केल्याने पथक माघारी.ज्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे, अशांना हा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. अद्यापही ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांनी त्वरित ते पूर्ण करून घ्यावे. मे मध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानीत कोणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही यांची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी..अठरा महसूल मंडलांत अतिवृष्टीसातारा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत तासगाव, खेड, पाटण, म्हावशी, हेळवाक, मोरगिरी, चाफळ, येराड, वाठार किरोली, शिरंबे, पसरणी, जावळी, आनेवाडी, बामणोली, महाबळेश्वर, तापोळा, नामज, पाचगणी अशा १८ महसूल मंडलांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या वेळी नजरअंदाजे नुकसानीची माहिती प्रशासनातर्फे सादर करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.