Satara News: कोयना धरणामध्ये जमीन गेली आहे परंतु अद्यापपर्यंत जमीन मागणीसाठी अर्ज केला नाही, अशा धरणग्रस्तांनी जमीन मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. महसूल प्रशासनाने पसंतीच्या जमिनी दाखविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले..पालकमंत्री कार्यालयात कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन व महिंद प्रकल्प ग्रस्तांना भूखंड वाटपाबाबत आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, अतुल म्हेत्रे, तहसीलदार अनंत गुरव, धरणग्रस्त उपस्थित होते..Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा.पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, की कोयना धरणग्रस्तांचे मूळ मालक हयात नाही अशांच्या वारसांनी अर्ज करावेत. ज्यांना अद्यापपर्यंत जमिनींचे वाटप झाले नाही अशांनी तत्काळ जमिनीची पसंती सांगावी..Masala Village Rehabilitation : मसाळा गावाचे अखेर पुनर्वसन होणार.ज्या धरणग्रस्तांकडे कागदपत्रे नाही अशांना प्रशासनाकडील उपलब्ध असलेली कागदपत्रेही देण्यात येतील. कोयना धरणग्रस्तांना सुलभपणे प्रकल्पग्रस्तांचे दाखल मिळावे यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांना सहज दाखले उपलब्ध होत असल्याने याचाही लाभ घ्यावा..महिंद प्रकल्पाअंतर्गत बोर्गेवाडीचे पुनर्वसन पाटण तालुक्यातील मौजे चांगुलेवाडी व सांगवड येथे करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना दोन एकर जमीन व ३७० चौरस फुटाचा भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना ही त्यांनी दिल्या..महिंद प्रकल्पांतील प्रकल्प ग्रस्तांच्या विविध सुविधांचा आढावा घेतला. या पुनर्वसित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची विहीर व रस्ता तयार करण्यात आला होता. त्या जागेची मोजणी करून हद्द निश्चित कराव्यात. ज्या प्रकल्प ग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना गणेशोत्सवानंतर जमिनी दाखविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. तसेच उदरनिर्वाह भत्याचा प्रस्तावही सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.