Solapur News: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले..जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री गोरे बोलत होते. या वेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम.Farmer Compensation Scam : अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे.महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, सचिन इथापे, विजया पांगारकर, तंत्र अधिकारी सतीश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अभियंता श्री. खांडेकर तसेच सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते..या वेळी श्री. गोरे म्हणाले, की अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी विविध यंत्रणेनुसार तातडीने पंचनामे सुरू करावेत. पाऊस आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती, घरे, व जनावरांचे तातडीने पंचनामे सुरू करावेत..Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका.या अतिवृष्टीमध्ये जीवित व वित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी. या कामासाठी आवश्यकतेनुसार गटविकास अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व इतर तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करावेत व त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा..राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. श्री. आशीर्वाद यांनी, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नुकसानीबाबतची, उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची व विसर्गाची माहिती दिली. .जिल्ह्यात ४७ हजार ८०४ हेक्टर पिकांचे नुकसानजिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे १७२ गावे व ४६ हजार ३४८ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांचे ४७ हजार ८०४.३४ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ हजार ४७१ हेक्टरचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ हजार ०४, माढा तालुक्यात ८ हजार ७२१ तर पंढरपूर तालुक्यातील ५२९५ हेक्टरवर नुकसान झाले आहे..पूरस्थितीत ३ पशुधन दगावले तर अक्कलकोट ४५, दक्षिण सोलापूर २ व माळशिरसमधील १ अशा ४८ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर, शेळगी, मार्डी, वडाळा, तिर्ऱ्हे तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुस्ती व अक्कलकोट तालुक्यातील किणी मंडलात अतिवृष्टी झालेली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.