New Delhi News : जीएसटी करप्रणालीतील सुधारणेमुळे अर्थव्यवस्थेला चालना तर गरीब-मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २१) देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले..शक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजे नवरात्रीला सोमवारपासून (ता. २२) सुरुवात होत आहे. याच दिवशी जीएसटी सुधारणा लागू होत आहेत. देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे जनतेचे आणि छोट्या-मध्यम उद्योजकांचे तोंड गोड होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या सूर्योदयासमवेत नव्या पिढीच्या सुधारणा लागू होतील. एकप्रकारे देशात जीएसटी बचत उत्सवाची सुरुवात होत आहे, असे मोदी यांनी सांगितले..जीएसटी करकपातीमुळे जनतेची बचत वाढेल आणि विविध प्रकारच्या वस्तू ते सहज खरेदी करू शकतील. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, युवावर्ग, उद्योजक, महिला अशा सर्व घटकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यापुढील काळात देशात ५ आणि १८ टक्के असे कराचे दोन टप्पे राहतील. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या असंख्य वस्तूंचे दर आवाक्यात येणार आहेत. अनेक वस्तू आणि सेवा एकतर करमुक्त होतील अथवा स्वस्त होतील. ज्या वस्तूंवर १२ टक्के कर लावला जात होता. त्या श्रेणीतील ९९ टक्के वस्तू ५ टक्के कराच्या श्रेणीत आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले..Agriculture Equipment GST: कृषी यंत्र उद्योगांनी सुधारित जीएसटीची अंमलबजावणी करावी : कृषिमंत्री चौहान.‘नागरिक देवो भव’ या मंत्रासह वाटचाल सुरू आहे. त्याची झलक नव्या पिढीच्या सुधारणांमध्ये दिसून येते. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि जीएसटीच्या सुधारणांमुळे जनतेचे सुमारे अडीच लाख कोटी रुपये वाचणार आहेत. विकसित भारताच्या मार्गावर वाटचाल करत असताना आपल्याला आत्मनिर्भर बनावेच लागेल. करप्रणालीत सुधारणा करत असतानाच विकासाच्या घोडदौडीत प्रत्येक राज्याला सहभागी करून घेतले जाणार आहे, असे ते म्हणाले..करांच्या जंजाळातून मुक्त केले२०१७ मध्ये एक ‘देश-एक करप्रणाली’, अर्थात जीएसटी प्रणाली लागू करून देशाला विविध प्रकारच्या करांच्या जंजाळातून मुक्त करण्यात आले, असे सांगत पंतप्रधान म्हणाले, की देशाला आत्मनिर्भर करण्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे मोठे योगदान राहणार आहे. ज्या वस्तू देशात बनू शकतात, त्या देशातच बनवल्या पाहिजेत. .लोकांनी देखील स्वदेशी वस्तूंची खरेदी आणि विक्री केली पाहिजे. ‘स्वदेशी वस्तू खरेदी करतो’ असे प्रत्येकाने गर्वाने सांगितले पाहिजे. मागील ११ वर्षांत २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केले आहे. नवीन मध्यमवर्गीय श्रेणीत हे लोक सामील झाले आहेत. प्राप्तिकरातील सवलत आणि जीएसटी करातील कपात असा दुप्पट लाभ या लोकांना होणार आहे..GST Cuts : २२ सप्टेंबरपासून ट्रॅक्टर स्वस्त; जीएसटी कपातीचा लाभ शेतकऱ्यांपर्यत पोहोचवा : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान.जीएसटी बचत उत्सवामुळे घर बनविणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, स्कूटर अथवा मोटरकार खरेदी करणे, प्रवास करणे अशा सर्व बाबी स्वस्त आणि सोप्या होणार आहेत. जीएसटी कमी झाल्याचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना दुहेरी लाभ होईल. त्यांची विक्री वाढेलच पण त्यांच्यावरील कराचा भार कमी होईल. .देशाच्या समृद्धीला स्वदेशीच्या माध्यमातून शक्ती मिळणार आहे. आज आपल्या जीवनाशी असंख्य विदेशी वस्तू जोडल्या गेल्या आहेत. या वस्तूंपासून मुक्ती मिळवावी लागेल. प्रत्येक घर आणि दुकानाला स्वदेशीचे प्रतीक बनवावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून केलेले हे ११ वे भाषण होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पहिले भाषण करताना त्यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. तर अलीकडील काळात १२ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती त्यांनी देशवासीयांना दिली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.