GST rate cut impact: मोदी सरकारच्या जीएसटी दर कपातीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपये येतील. यामुळे सर्वसामान्यांच्या हातात अधिक पैसे राहतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ."या नव्या जीएसटी कर प्रणालीत ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांचा ओघ येईल. तसेच लोकांच्या हातात अधिक पैसे राहतील," असे सीतारामन यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील..Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार.नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांबाबत आयोजित संवाद कार्यक्रमात, सीतारामन यांनी अधोरेखित केले की, याआधी १२ टक्के जीएसटी लागू असलेल्या ९९ टक्के वस्तू आता ५ टक्क्यांच्या श्रेणीत आल्या आहेत. याव्यतिरिक्त, २८ टक्के जीएसटी असलेल्या ९० टक्के वस्तू १८ टक्क्यांच्या श्रेणीत आल्या आहेत..२२ सप्टेंबर रोजी नवीन जीएसटी सुधारणा लागू होण्याआधीच, प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंचे (FMCG) उत्पादन घेणाऱ्या कंपन्या स्वत:हून दर कमी करत आहेत. याचा सामान्य ग्राहकांना फायदा होत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे..GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?.सीतारामन यांच्या मतांनुसार, जीएसटी सुधारणा लागू करण्यापूर्वी एनडीए सरकारने ५ आवश्यक निकष विचारात घेतले. यात गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणे, मध्यमवर्गीयांची आकांक्षापूर्ती, शेतकऱ्यांना पाठिंबा, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती आणि निर्यात क्षमता असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे या गोष्टींचा समावेश आहे..जीएसटीमधून मिळणाऱ्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. जीएसटी महसूल २०२५ मध्ये २२.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. जो २०१७-१८ मधील आर्थिक वर्षात ७.१९ लाख कोटी रुपये होता, असे सीतारामन यांनी सांगितले..यूपीए सरकार जीएसटी का आणू शकले नाही?"यूपीए सरकार १० वर्षे सत्तेत होते. पण जीएसटी आणू शकले नाहीत. तुम्ही राज्यांना जीएसटीबाबत विश्वासात घेऊ शकला नाहीत. मी कठोरपणे राजकीय वक्तव्य करु शकले असते. पण आज राजकीय मुद्यावर बोलणार नाही," असे त्या म्हणाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.