ठळक मुद्देजीएसटी सुधारणांनंतर मदर डेअरीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमीदूध, पनीर, बटर, चीज, तुपासह दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत कपातही कपात २२ सप्टेंबरपासून लागू.Mother Dairy Reduces Milk Prices : केंद्र सरकारने जीएसटीत सुधारणा केल्यानंतर पहिल्यांदा मदर डेअरीने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. दूध, पनीर, बटर, चीज, तुपासह दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्य उत्पादनांच्या किमती कमी करत असल्याचे मदर डेअरीने म्हटले आहे. ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होईल, असे सांगण्यात आले आहे..जीएसटीत सुधारणांनंतर ही कपात केली आहे. मदर डेअरीने पुढे सांगितले की त्यांची सर्व उत्पादन आता शून्य कर श्रेणी अथवा सर्वात कमी ५ टक्के कर स्लॅबमध्ये येतात..Clean Milk Production: स्वच्छ दुधाचे उत्पादन कसे करावे? .यूएचटी दूध, पनीर, बटर, चीज, तूप, मिल्कशेक आणि आईस्क्रीम यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही आता कमी होत आहेत. या उत्पादनावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के आणि ५ टक्क्यांवरुन शुन्य टक्क्यांवर आला आहे. उदा. १ लिटर यूएचटी दूध (टेट्रा पॅक) आता ७५ रुपयांना मिळेल. ज्याचा दर आधी ७७ रुपये होता. तर ५०० ग्रॅम बटरचा दर ३०५ रुपयांवरून २८५ रुपयांपर्यंत खाली आणला आहे..Dudh Dar : जीएसटी झाला कमी, दूध स्वस्त होणार का?; ‘अमूल’, ‘गोकुळ’नं स्पष्ट केली भूमिका.त्याचप्रमाणे, मदर डेअरीचे आईस्क्रीम आणि इतर पदार्थांचे दरदेखील सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. चोको व्हॅनिला कोन आणि केसर पिस्ता कुल्फी सारखे आईस्क्रीम ५ ते १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर फ्रोझन फ्रेंच फ्राईज, आलू टिक्की आणि पॅकिंग केलेले नारळ पाणी यासारख्या उत्पादनाच्या किमतीत ५ ते १५ रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत..विशेष म्हणजे, फुल क्रीम, टोन्ड आणि गाईचे दूध यांसारखे पिशवीतील दूध आधीपासूनच जीएसटीमुक्त आहे. यामुळे त्याचा किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, मदर डेअरीनंतर आता इतर दूध संघ दुग्धजन्य उत्पादनांच्या दरात बदल करण्याची शक्यता आहे..असे आहेत नवीन दरमदर डेअरीच्या १ लिटरच्या टोण्ड ट्रेटा पॅक यूएचटी दूधाचा दर २ रुपये स्वस्त होऊन ७५ रुपयांवर आला आहे. तर पिशवीतील डबल टोण्ड यूएचटी दूधाचा दर (४५० मिलिलीटर) ३३ रुपयांवरुन ३२ रुपयांवर आला आहे. मिल्कशेक (१८० मिलिलीटर) ३० रुपयांवरुन २८ रुपये, पनीर (२०० ग्रॅम) ९५ रुपयांवरुन ९२ रुपये, बटर (५०० ग्रॅम) ३०५ रुपयांवरुन २८५ रुपयांवर आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.