GST Cuts : वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेने नुकतेच १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द केले. ट्रॅक्टर आणि कंपोस्टिंग मशीनसह शेतीशी संबंधित अक वस्तूंवर आता १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. हे नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील..दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित उपकरणे उत्पादकांना २२ सप्टेंबरपासून जीएसटी कपातीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. जीएसटी कपातीमुळे विविध श्रेणींमधील ट्रॅक्टरचे दर २३ हजार ते ६३ हजार रुपयांपर्यंत कमी होतील, असेही त्यांनी सांगितले..Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार.शिवराज सिंह चौहान यांनी शेती उपकरणे उत्पादकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चौहान म्हणाले की, जीएसटी कमी केल्याने देशभरातील कस्टम हायरिंग सेंटर्समधील शेती यंत्रसामग्री स्वस्त होईल आणि त्यानुसार त्याचा भाडेदरही कमी व्हायला हवा..GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?.चौहान पुढे म्हणाले की, शेतीशी संबंधित उपकरणे आणि यंत्रसामग्रीचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. पण संबंधित कंपन्या आणि त्यांच्या डीलर्सनी हा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. दर कमी झाल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार जागृती मोहीम राबवेल, असे त्यांनी नमूद केले..सीमांत आणि छोट्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेती उपकरणे आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, हा कस्टम हायरिंग सेंटरचा प्रमुख उद्देश आहे..नवीन जीएसटी दरांचा शेतकऱ्यांना कसा होईल लाभ? ट्रॅक्टरवरील बचत ४१ हजार ते ६३ हजार रुपयांपर्यंतपॉवर टिलरवरील बचत ११,८७५ रुपयेसीड ड्रीलवर बचत ३,२२० रुपये ते ४,३७५ रुपयांपर्यंतमल्टीक्रॉप थ्रेशरवरील बचत १४ हजार रुपयेहार्वेस्टर बचत १,८७,५०० रुपयेस्ट्रॉ रीपरवरील बचत २१,८७५ रुपयेबेलरवरील बचत ९३,७५० रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.