Chhatrapati Sambhajinagar News: राज्य गीत तसेच देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत कार्यक्रम येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा कार्यक्रम होणार आहे.या उपक्रमात जिल्ह्यातील ५ वी ते ८ वीचे १ लाख २५ हजार विद्यार्थी सहभागी होतील, असे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. .यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राज्यातील १ लाख शाळांमध्ये ७ लाख शिक्षक व २ कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. संस्कार दशसुत्रीचे, रंग देशभक्तीचे असे या कार्यक्रमाचे नाव आहे.जिल्ह्यात १ लाख २५ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे..Agricultural Fellowship Program : नारायणगाव येथील कृषी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना फेलोशिप.यासंदर्भात मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (मध्य.) .Seed Production Program : ‘महाबीज’चा ६ हजार हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम.आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजन) अरुण शिंदे, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत जोगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लढ्ढा, पोलीस उपनिरीक्षक गौतम पाताडे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती धसवाडीकर, सचिन वाघ, हेमंत उशीट, चेतन कांबळे, मनोज चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर सय्यदा फिरासात आदी उपस्थित होते..जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी एकाच वेळी एकाच सुरात राज्यगीत व देशभक्तिपर गीतांच्या तालावर कवायत करतील, या उपक्रमासाठी जिल्हा ते तालुका पातळीवर मैदाने नक्की करणे, विद्यार्थ्यांची वाहतूक शक्यतो करावी लागणार नाही किंवा कमितकमी करावी लागावी यादृष्टीने नियोजन करावे,असे निर्देशही त्यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.