Edible Oil Mission: शंभर टक्के अनुदानावर ‘कृषी’तर्फे भुईमूग बियाणे
Oilseed Production: देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर उन्हाळी भुईमूग बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.