Jalgaon News: खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड सुरूच आहे. यंदा क्षेत्रात किंचित वाढ होताना दिसत आहे. या आठवड्यातही पेरणी सुरू राहणार असून, काही विशिष्ट वाणांना मागणी असून त्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. .आगाप भुईमुगाची पेरणी मागील महिन्यात अनेकांनी केली. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला सुरुवात झाली. पेरणीला मागील तीन ते चार दिवसांत वेग आला. सर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झाली. खानदेशात भुईमुगाची पेरणी २०-२५ जानेवारीपर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देत आहेत..Groundnut Farming: उन्हाळी भुईमूग लागवडीचे सुधारित तंत्र.पावसाने उत्साहमागील हंगामात खानदेशात सुमारे ८५० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ९०० ते १००० हेक्टर क्षेत्रावर होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. यंदा पाऊसमान चांगले होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन मिळाल्याने रब्बी हंगाम चांगला आहे..जळगाव जिल्ह्यात सुमारे १३२ टक्के पाऊस झाला. धुळ्यात १२० टक्के व नंदुरबारमध्येही सुमारे १२५ टक्के पाऊस झाला. अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले..जळगावातील हतनूर, वाघूर, गिरणा, मन्याड, बहुळा, तोंडापूर, भोकरबारी, अग्नावती, धुळ्यातील पांझरा, अमरावती, मालनगाव, बुराई, नंदुरबारमधील देहली, दरा, चिरडे, सुसरी आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे..Groundnut Farming: अकोला जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीला सुरुवात.सर्वत्र पेराभुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार या भागांत वाढणार आहे. २०२० ते २२ या तीन वर्षांत खानदेशात भुईमुगाची पेरणी ३०० हेक्टरवरून सुमारे ८५० हेक्टरवर पोहोचली होती. कारण या कालावधीत चांगला पाऊस झाला होता. मागील वर्षी लागवड घटली. पण यंदा लागवड काहीशी वाढणार आहे..चोपडा तालुका आघाडीवरखानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागांत भुईमुगाची पेरणी स्थिर राहणार आहे. परंतु सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा या भागांत पेरणी काहीशी वाढणार आहे. चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाल्याची माहिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.