Groundnut Farming: खानदेशात भुईमुगाची लागवड जानेवारीपर्यंत झाली. पीक जोमात असून, यंदा क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर स्थिर आहे. सर्वाधिक पेरणी चोपडा (जि.जळगाव) तालुक्यात झाली आहे. .भुईमुगासाठी खानदेशातील सातपुडा पर्वतालगतचा भाग प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या भागात भुईमुगाची पेरणी अधिकची केली जाते. खानदेशात मध्यंतरी भुईमुगाची पेरणी घटली होती. ही पेरणी फक्त ४०० ते ४५० हेक्टरवर मर्यादीत होती. कारण पाऊसमान तीन वर्षांपूर्वी कमी होते. तसेच दरांबाबतही समाधानकारक स्थिती नव्हती. .Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक.परंतु चांगला पाऊस व दरातील स्थैर्य यामुळे शेतकरी भुईमुगाची पेरणी किंवा लागवड करू लागले. यंदा चांगल्या पावसामुळे लागवड वाढेल, असे असे सांगण्यात येत होते. अर्थात पेरणी वाढली आहे. अलीकडे जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा भागातही पेरणी होऊ लागली आहे. मागील दोन वर्षे तेलबियावर्गीय पिकांचे दर स्थिर आहेत. यात भुईमुगासही सहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे. तसेच एकरी सात ते आठ क्विंटल शेंगांचे (वाळविलेल्या) उत्पादन अनेकांनी घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी विक्री १० ते १२ क्विंटल उत्पादनदेखील घेतले. मका, गहू आदी पिकांच्या तुलनेत भुईमूग परवडल्याने शेतकरी या पिकास पसंती देत आहेत. मागील दोन वर्षे क्षेत्र सातत्याने वाढले..Groundnut Cultivation : मोखाड्यात २५० एकरवर भुईमुग लागवड ; रोजगारासाठी आदीवासींचे स्थलांतर घटण्यास मदत.खानदेशात यंदा सुमारे १२५० हेक्टरवर भूईमूग पीक आहे. यात जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, चाळीसगाव भागात अधिकचा पेरा किंवा लागवड झाली आहे..जानेवारीत अधिक पेरणीखानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीत अधिक झाली असून, अनेक शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन करीत आहेत. यामुळे पाणी कमी लागत असून, पीकस्थिती सध्या बरी आहे. मागील महिन्यातही काही शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. लागवडीसाठी शेतकरी मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. पीक जोमात आहे. शेंगा लागल्या असून, त्या पक्व होत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.