Maharashtra Rooftop Solar Policy Update: राज्यातील छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविलेल्या सर्व वीज ग्राहकांना ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ भरावा लागणार असल्याचा गैरसमज काही हितसंबंधी गटांकडून पसरविला जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील केवळ ०.१४ टक्का वीज ग्राहकांनाच हा अधिभार लागू झाला असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली..राज्यात महावितरणचे एकूण ३ कोटी १७ लाख वीज ग्राहक आहेत. त्यापैकी केवळ ४४ हजार २४६ ग्राहकांना ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ लागू झाला आहे. म्हणजेच ९९ टक्क्यांहून अधिक ग्राहक या अधिभाराच्या कक्षेबाहेर आहेत..India Electricity Demand : उष्णतेच्या लाटामुळे विजेची मागणी वाढली; वीज उत्पादन १६७.६१ अब्ज किलोवॅट तासांवर पोहचले.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या ग्राहकांचा मंजूर भार १० किलोवॅटपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविला आहे, अशा ग्राहकांनाच हा चार्ज लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महावितरणने संबंधित ग्राहकांकडून अधिभार आकारण्यास सुरुवात केली आहे..राज्यातील २ कोटी ३७ लाख घरगुती ग्राहकांपैकी ६ लाख ५७ हजार ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविले आहेत. त्यापैकी केवळ १६ हजार ४१० ग्राहकांनाच, म्हणजे २.४९ टक्के सौरऊर्जा वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना हा चार्ज लागू झाला आहे. एकूण घरगुती ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ०.०७ टक्के आहे..औद्योगिक क्षेत्रात राज्यातील ४ लाख ४५ हजार उच्चदाब व लघुदाब ग्राहकांपैकी फक्त ८ हजार ८९४ ग्राहकांना, म्हणजे सुमारे २ टक्के ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज लागू झाला आहे. तर २३ लाख ३० हजार व्यावसायिक ग्राहकांपैकी १२ हजार ८३२ ग्राहकांना, म्हणजे ०.५५ टक्के ग्राहकांना हा अधिभार लागू करण्यात आला आहे..Electricity Departments Action: सिंगल फेज वापरणाऱ्या १९२ जणांवर कारवाई.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०१९ मध्ये छतावरील सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या ग्राहकांवर ग्रीड सपोर्ट चार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी राज्यातील एकूण सौरऊर्जा क्षमता २ हजार मेगावॅट झाल्यानंतर हा चार्ज लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नंतर २०२३ मध्ये ही मर्यादा ५ हजार मेगावॅटपर्यंत वाढविण्यात आली. राज्याने यंदाच्या सुरुवातीला ५ हजार मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडल्यानंतर आयोगाने २५ मार्च २०२६ च्या वीजदर आदेशात ग्रीड सपोर्ट चार्ज निश्चित केला..सौर ऊर्जा ग्राहकांना १२९ कोटी रुपयांचा लाभछतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून अतिरिक्त वीज महावितरणला पुरविणाऱ्या ग्राहकांना आर्थिक लाभ दिला जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील ४ लाख ९० हजार ग्राहकांना एकूण १२९ कोटी ५७ लाख रुपयांचा लाभ मिळाला. त्यामध्ये ४ लाख ७२ हजार घरगुती ग्राहकांचा समावेश असून, त्यांना १२४ कोटी ५५ लाख रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती महावितरणने दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.