Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी येथील तपोवन भागात साधुग्राम उभारण्यासाठी तब्बल १८०० वृक्षांची तोड करण्याचा निर्णय झाला होता. त्यास विरोध झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलन उभारले. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली. लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली असून, महापालिका व वृक्षप्राधिकरणाला म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. .अॅड. श्रीराम पिंगळे यांनी वृक्षतोडीच्या भूमिकेविरोधात पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली. तातडीची बाब म्हणून या याचिकेवर न्या. दिनेशकुमार सिंह व तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजितकुमार वाजपेयी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली..Tapovan Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात शेतकरी संघटना मैदानात.साधुग्राम उभारण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या एकूण जागेपैकी ३७ एकर जागेवर गेल्या दहा वर्षांत उभ्या राहिलेल्या वृक्षांसह पुरातन वृक्ष तोडण्याची महापालिकेच्या उद्यान विभागाने तयारी केली. महापालिकेच्या वतीने १ हजार ८२५ वृक्षांची तोड करण्यासाठी हरकती मागविण्यात आल्या..वृक्षतोडी विरोधात नऊशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, भाजपच्या नेत्यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले. परंतु वृक्षतोडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती..Protest For Tree: ‘वृक्ष बचाव’साठी तपोवनात एकवटले पर्यावरण प्रेमी .अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह नाशिकच्या स्थानिक कलाकारांनी त्याला विरोध केला. शाळा, सामाजिक संस्था असे अनेक जण वृक्षतोडीविरोधात एकवटले होते, पण प्रशासनाने स्वतःची भूमिका कायम ठेवली होती..याचिकेत काय?वृक्षतोड करताना व्यवहार्य पर्यायांचा शोध घेतला नाही. वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. वृक्षतोड करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने सार्वजनिक सूचना दिली नाही. वृक्षगणना न करताच वृक्षतोडीच्या परवानग्या दिल्याने नाशिकचे पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे याचिकेत म्हटले आहे..लवादाच्या आदेशात काय?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय वन अधिकारी आणि नाशिक महापालिका आयुक्तांची त्रिसदस्यीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, दोन आठवड्यांत वस्तुस्थितिदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जानेवारीला पुढील सुनावणी होईल तोपर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश लवादाने दिल्याची माहिती अॅड. पिंगळे यांनी दिली..वृक्षतोडीला मोठा विरोध होत असताना महापालिका आयुक्तांकडून बेजबाबदारपणे वक्तव्ये करून फक्त दोन-तीन लोकांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. आता लवादाने कायदेशीर प्रक्रिया राबविल्याशिवाय झाडे तोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. अॅड. श्रीराम पिंगळे, याचिकाकर्ते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.