Maharashtra News Update: राजस्थानमधून महाराष्ट्रात स्थलांतर करणाऱ्या रायका मेंढपाळांना यंदा मात्र स्थानिक मेंढपाळांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यातून दोन्ही गटांमधील संघर्ष वाढला आहे. त्यातच बुलडाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने राज्याबाहेरील जनावरांना चराईबंदी लागू केल्याने हा संघर्ष आणखी चिघळला आहे. .राजस्थानमधील पाली, जालोर आणि सिरोही भागातील रायका समाजाचे मेंढपाळ मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात दाखल होतात. नोव्हेंबर ते जानेवारी किंवा फेब्रुवारीअखेरपर्यंत त्यांचे स्थलांतर सुरू असते. या काळात सुमारे ५० हजार मेंढ्या महाराष्ट्रात येतात. यंदा तीन जिल्ह्यांत चराईबंदी लागू झाल्याने मेंढपाळांना जिल्ह्यांच्या सीमेवरच रोखले जात आहे. काही ठिकाणी यावरून तणावाचे प्रसंगही घडले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातूनही मेंढपाळांचे स्थलांतर होते..Shepherds Migration: पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधवांचा मुक्काम.नंदुरबारमधील मेंढपाळ गुजरातमध्ये, तर अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील मेंढपाळ मध्य प्रदेशात जातात. त्यामुळे एका बाजूला स्थलांतराची परंपरा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला राजस्थानमधील मेंढपाळांना रोखायचे, अशी भूमिका योग्य नसल्याचे काही समाजसेवेची म्हणणे आहे. यापूर्वी २०१७ मध्ये मध्यप्रदेश राज्यात मेंढपाळांवर अशाच प्रकारची बंदी घातली होती. त्याविरोधात मेंढपाळांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही कारवाई बेकायदेशीर ठरवून वनविभागाला दंड केला होता, अशी माहिती सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्हचे अध्यक्ष सजल कुलकर्णी यांनी दिली..यंदाच्या प्रवेशबंदीबाबत विभागीय आयुक्त नयना गुंडे तसेच अमरावती आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मेंढपाळांचे स्थलांतराचे मार्ग परंपरागत आहेत. त्यांना रोखताना कोणतीही ठोस खबरदारी किंवा पर्यायी व्यवस्था केली जात नाही. स्थानिक संसाधनांचे नुकसान होत नसताना प्रवेशबंदीचा निर्णय घेण्याचे कारण नाही. प्रशासनाने लसीकरणाची प्रमाणपत्रे तपासावीत किंवा आवश्यकतेनुसार लसीकरण मोहीम राबवावी. ही परंपरा कायम राहिली पाहिजे.सजल कुलकर्णी, अध्यक्ष, सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह, नागपूर.राजस्थानमधून येणारे मेंढपाळ दरवर्षी आमच्या जिल्ह्यातील बहुतांश भागांत येतात. शेतातील पीक अवशेष मेंढ्या खातात. त्यांच्या विष्ठेमुळे शेताला पौष्टिक खत मिळते आणि जमिनीची सुपीकता वाढते. याशिवाय मेंढपाळ शेतकऱ्यांना काही रक्कमही देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होतो. मेंढपाळांना प्रवेश मिळावा, यासाठी वारखेड येथे शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे.लक्ष्मीकांत कौठकर, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील गट).Climate Change Solution: दिशादर्शक ‘मेंढपाळ’.स्थलांतरित जनावरांपैकी काही जनावरे रोगबाधित असल्यास त्यांच्या विष्ठेतून संबंधित रोगाचा प्रसार इतर जनावरांसह माणसांमध्येही होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थलांतरित जनावरांची यादृच्छिक तपासणी करण्याची गरज आहे.डॉ. सुधीर चौधरी, विभागप्रमुख, सामूहिक स्वास्थ्य विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय.आमचा विरोध परप्रांतीय मेंढपाळांना नाही. मात्र यंदा महाराष्ट्रात दुष्काळी स्थितीमुळे चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत आधी स्थानिक मेंढपाळ आणि त्यांच्या पशुधनाच्या जगण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अनेक जिल्ह्यांत चारा वाहतूक तसेच परप्रांतीय जनावरांच्या चराईवर बंदीचे आदेश असतानाही हे आदेश डावलून राजस्थानातील मेंढपाळ महाराष्ट्रात आले कसे, हा आमचा सवाल आहे. या मेंढ्यांचे लसीकरण आणि आरोग्य तपासणी झाली आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. तपासणी न करता जनावरांना प्रवेश दिला असेल, तर त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनाही निवेदन दिले आहे. संतोष महात्मे, अध्यक्ष, मेंढपाळ धनगर विकास मंच.आमचे पणजोबा, आजोबा आणि वडील अशा तीन ते चार पिढ्यांपासून या भागात स्थलांतर करीत आहेत. गेल्या ७० वर्षांपासून आम्ही येथे येत असून, आमचा जन्मही याच भागात झाला आहे. अकोला जिल्ह्यातील आडगाव भागात आम्ही शेती खरेदी केली आहे. यंदा शेतकरी आम्हाला मेंढ्यांसह शेतात येण्यासाठी सहकार्य करीत असताना स्थानिक मेंढपाळ मात्र विरोध करीत आहेत. हा प्रकार चुकीचा असून, शासनाने आम्हाला सहकार्य करावे. देवराम चोपशी, मेंढपाळ, जालोर, राजस्थान.माणुसकीच्या नात्याने माणसांना किंवा जनावरांना देशांतर्गत स्थलांतरासाठी विरोध होणे चुकीचे आहे. मेंढपाळांनीही सामंजस्याची भूमिका घेत संघर्ष टाळला पाहिजे. राज्याबाहेरून येणाऱ्या जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची आहे. संविधानातील तरतुदींचा आधार घेत सरकारने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. महादेवराव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.