Nashik News: केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागांतर्गत विपणन व निरीक्षण संचालनालयाचे उपकार्यालय नाशिक आणि मर्सेल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोठुरे (ता. निफाड) येथे राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. .शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे तसेच ग्रेप्स एक्स्पोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कैलासराव भोसले होते..National Farmers Day: राष्ट्रीय किसान दिनानिमित्त २१ शेतकऱ्यांचा सन्मान.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विपणन व निरीक्षण संचालनालय मुंबई येथील उप-कृषी विपणन सल्लागार डॉ. राजेंद्र करपाटे होते. .National Farmers Day 2025: आज शेतकरी दिवस, चौधरी चरण सिंह यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय?.या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, मर्सेल फूड्सचे संचालक आलोक कुमार सिंह, एनएचआरडीएफ चितेगाव केंद्राचे उपसंचालक व केंद्रप्रमुख डॉ. सुजय पांडे, ॲगमार्कचे विपणन अधिकारी बुद्धिविलास यादव, सोनाली बागडे तसेच मर्सेल फूड्सचे श्याम ढोंमसे, स्वप्नील आवारे आदी उपस्थित होते.....यांचा झाला सन्मानबाळासाहेब घडवजे(वणी), शरद वावधणे (मानोरी), सुरेश राका (ओझर), गुलाब घुमरे (जानोरी), संपत बागल (बागलवाडी), सचिन संभेराव, उमेश संभेराव (मानोरी), अरविंद बोराडे, समाधान बोराडे (नेवरगाव), श्रावण वावधणे (मानोरी), रवींद्र संभेराव (मानोरी), रवींद्र शिंदे (कोळवाडी), उमेश भालेराव (तिसगाव), शिवाजी घुले (मावडी)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.