Palghar News : विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गवत विक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. त्यामुळे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार म्हणतात ते त्यांच्या बाबातीत खरे ठरले आहे. .विक्रमगड तालुक्यातील खेडोपाडी गणपती सणाच्या आधीपासून गवत खरेदी-विक्रीचा व्यवसाय थोड्या-फार प्रमाणात चालू झाला आहे. गणपती उत्सव झाल्यानंतर या व्यवसायाला जोर आला आहे. .Rural Employment : ग्रामीण भागातील रोजगाराचा कल्पवृक्ष .रोजगारासाठी या भागातील मजुरांना वणवण भटकावे लागते. रोजगाराअभावी अनेकांना स्थलांतराचा पर्याय निवडावा लागतो. पावसाळ्यात खेडोपाडी रोजगाराचा आधार असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे काही अंशी बंद आहेत. .या पावसाळ्याच्या चार महिन्यांत माळरानावर, जंगलात नैसर्गिक उगवणारे गवत विकून काही अंशी मजुरांना थोडा-फार रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. .Rural Employment : एकही सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार नाही ; मंत्री लोढांची ग्वाही.भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हलाखीचा असल्याने व या महिन्यात गौरी-गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. सर्व संकटांवर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या मजुरांना आधार आहे. भारे बांधून गवत विकण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे..तंगीच्या काळात गवतातून रोजगारपावसाळ्यात रोजगार हमीची कामे व अनेक व्यवसाय ठप्प असले तरी गवताचा व्यवसाय कमी प्रमाणात का होईना ग्रामीण भागात सुरू झाला आहे. या व्यवसायात गवताच्या लहान चार जुड्यांची एक धडी आणि प्रत्येक धडीला आठ ते १० रुपये गवत कापणाऱ्यास तर जागामालकास आठ रुपये मिळतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.