Pest Management: तूर हे एक महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. या पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार पिकावर अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या वर्षी तूर पिकात कोळी किडीचा तसेच वांझ रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक आढळून आला. साधारणपणे तूर पिकावर फुलधारणेच्या काळात पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी आणि पिसारी पतंग अशा महत्त्वाच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. सद्यःस्थितीत काही भागांत तूर पीक कळी अवस्थेत तर काही भागांत फुलधारणेच्या अवस्थेत आहे. .सद्यस्थितीत अनेक ठिकाणी तूर पिकावर दुय्यम समजल्या जाणाऱ्या पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही अळी पाने गुंडाळून आतील भाग कुरतडून नुकसान करते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होऊन पिकाची वाढ खुंटते आणि फुलांची संख्या कमी होऊ शकते. या किडीच्या नुकसानीचे स्वरूप पाने व फुले जाळी करणारी अळी (शा. नाव : मारुका विट्राटा) यासारखे असल्याने ओळख पटविण्यात गफलत होऊ शकते..विशेष म्हणजे, या किडीसोबत नैसर्गिक मित्रकीटकांच्या कोष अवस्थाही प्रक्षेत्र भेटीदरम्यान दिसून आल्या आहेत. किडीच्या नियंत्रणासाठी किडीची ओळख, नुकसानीची लक्षणे आणि मित्रकिटकाची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होईल..Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन .शास्त्रीय नाव : ग्राफोलिटा क्रिटिका (Grapholita critica)जीवनक्रमकिडीचा अंड्यातून अळी बाहेर पडण्याचा कालावधी साधारणतः २ ते ४ दिवसांचा असतो. अळीच्या चार अवस्था १६ ते १८ दिवसांत पूर्ण होतात. कोष अवस्थेचा कालावधी ५ ते ६ दिवसांचा असतो, तर प्रौढ अवस्था ९ ते १० दिवसांची असते. संपूर्ण जीवनचक्र ३३ ते ३९ दिवसांत पूर्ण होते.अंडी ः अंडी कळ्यांवर व कोवळ्या पानांवर साधारणपणे दहा इतकी समूहाने घातली जातात. अंडी चपटी, अंडाकृती आकाराची, पारदर्शक आणि फिक्कट पांढऱ्या रंगाची असतात. अंड्याची दोन्ही टोके गोल असतात. .अळी : अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या गुळगुळीत व फिक्कट पिवळट, पांढऱ्या रंगाच्या असतात. शरीरावर अतिशय विरळ केस आढळतात. पूर्ण वाढ झालेली अळी पुढील भागात फिक्कट हिरव्या, तर मागील भागात फिक्कट लालसर रंगाची दिसते. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी सुमारे ६.६ मि.मी. आणि रुंदी १.३ मि.मी. असते.कोष : अळीने गुंडाळलेल्या भागातच ती कोष अवस्था धारण करते. नवीन तयार झालेला कोष फिक्कट पिवळ्या रंगाचा असून नंतर तो हळूहळू लालसर तपकिरी रंगाचा होतो.प्रौढ (पतंग) : नर पतंग तपकिरी रंगाचे आणि आकाराने लहान असतात. सरासरी लांबी ५.९ मि.मी. व रुंदी ११.७ मि.मी. असते. मादीचा पोटाचा भाग नराच्या तुलनेत किंचित जाड असतो..नुकसानीचा प्रकारकिडीची अळी अवस्था रेशीमसारखा धागा तयार करून त्याच्या मदतीने पाने, कळ्या आणि फुले एकत्र गुंडाळते. अळी या जाळीच्या आत राहून पानांचे, कळ्यांचे आणि फुलांचे भाग खाते. जर प्रादुर्भाव शेंड्यावर झाला, तर त्या फांदीची पुढील वाढ खुंटते.किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेतून सुरू होऊन फुलधारणा आणि काही वेळा शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यंत चालू राहू शकतो.ही कीड पानांवर उपजीविका करणारी असली तरी, काही वेळा ती शेंगांवरही उपजीविका करू शकते..Tur Farming: तूर लागवडीत पीक संरक्षण, खत व्यवस्थापनाला प्राधान्य.किडीचे व्यवस्थापनपीक काढणीनंतर किडीच्या सुप्त अवस्था नष्ट कराव्यात.तूर पिकासोबत आंतरपीक म्हणून तृणधान्य पिकांची लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो, असे प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे.शक्य असल्यास किडीने जाळे केलेले भाग काढून त्यांचा नायनाट करावा.शेतातील अपॅन्टेलेस, ब्रॅकॉन आणि कॅम्पोलेटिस क्लोरिडी इत्यादी मित्रकिटकांचे संवर्धन करावे..नियंत्रणाची दिशाकर्नाटक राज्यातील एका संशोधन केंद्रात झालेल्या प्रायोगिक चाचणीत निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात केलेली फवारणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरल्याचे आढळले आहे. तथापि ही अधिकृत शिफारस म्हणता येणार नाही.जैविक कीटकनाशकाची फवारणी देखील या किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरू शकते. अधिक सल्ला- मार्गदर्शनासाठी संबंधित कीटकशास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.