Pune News: रात्री थंडीचा वाढलेला कडाका... पहाटे द्राक्ष घडावर पडणारे दव... अन् दिवसभर कडक उन्हामुळे द्राक्षांना बसणारा चटका. यामुळे हंगामावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. द्राक्ष घडांवर साचलेले दव व दिवसभराच्या उन्हाच्या चटक्यामुळे द्राक्ष मण्यांना सनबर्निंग होत आहे. यामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औषध फवारणीचा खर्च वाढल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे..बदललेल्या वातावरणामुळे सध्या द्राक्षावर संकट येऊन ठेपले आहे. वाढीव औषधांच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. द्राक्षाच्या मण्यांचे सनबर्निंग होण्याबरोबर द्राक्ष तयार होण्यास विलंब होत आहे. परिणामी तोडणी हंगाम दहा ते पंधरा दिवसांनी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत..Grape Farming: द्राक्ष बागेतील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन.इंदापूर तालुक्यात सुमारे २५०० हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. बाजारात कायम आगाऊ दराने विकली जाणारी शरद सिडलेस, नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, कृष्णा सीडलेस या काळ्या वाणाचा व माणिक चमन, एसएसएन, आरके, सोनाक्का, सुपर सोनाक्का, अनुष्का यांसारख्या पांढऱ्या वाणांचा यामध्ये समावेश आहे..यापैकी सर्वाधिक क्षेत्र बोरी, कळस, बिरंगुडी, भरणेवाडी, शेळगाव, सणसर, काझड या भागात आहे. दरवर्षी द्राक्षाच्या हंगामात या भागातून सुमारे ४० हजार टन द्राक्षांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. यातून २०० कोटींहून अधिकची उलाढाल होते..Grape Farmers Issue: ...तर दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर करू.सध्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला असून, दररोज या भागातून ४० ते ५० टन द्राक्ष व्यापाऱ्यांकरवी बाजारात पाठविली जात आहे. द्राक्ष निर्यात अद्याप सुरू झालेली नसली तरी स्थानिक बाजारात पांढऱ्या द्राक्षाला १२० ते १४० रुपये तर काळ्या द्राक्षाला १७० ते २०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मुंबईसह दक्षिण भारतातून द्राक्षाला सध्या चांगली मागणी आहे. यामुळे आगाप छाटणी केलेल्या बागायतदारांच्या पदरी घामाचा योग्य दाम पडत आहे..विक्रीची घाई केल्यास नुकसानसध्या बाजारात द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी हंगामाची घाई न करता द्राक्ष पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर, मण्यांत साखर उतरल्यानंतर विक्री करणे जास्त हिताचे होईल. द्राक्ष विक्रीची घाई केल्यास नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे शेती तज्ज्ञांचे मत आहे..वर्षभरापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बदललेल्या हवामानाशी संघर्ष सुरू आहे. यंदा द्राक्षाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यातच तोडणी हंगाम तोंडावर आलेला असताना वाढलेल्या थंडीचा व चटकणाऱ्या उन्हाचा द्राक्ष उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. उन्हाच्या चटक्यांमुळे द्राक्षाच्या मण्यांना सनबर्निंग होत आहे. यातून द्राक्षाची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेश सांगळे, मानद सचिव, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.