Nashik News: द्राक्षपंढरीतून २०२५-२६ हंगामात द्राक्ष निर्यात बिगर युरोपियन व नंतर युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मालाची उपलब्धता कमी असल्याने यंदा नोव्हेंबरपासून दरात तेजी कायम आहे. परिणामी निर्यातीच्या अनुषंगाने दर जुळत नसल्याने आयातदारांकडून मागणी कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीच भारतीय द्राक्षांची निर्यात थंडावल्याचे चित्र आहे..नाशिकमधून नोव्हेंबर-२०२५मध्ये बिगर युरोपियन देशांमध्ये, तर जानेवारी-२०२६ मध्ये दुसऱ्या सप्ताहात युरोपियन देशांमध्ये निर्यात सुरू झाली आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत प्रारंभीच्या निर्यातीचे हे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी कमी आहे. युरोपमध्ये होणाऱ्या द्राक्ष निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेटनेट’ प्रणालीत द्राक्षांची नोंदणी करावी लागते. त्यात नाशिकमध्ये यंदा (ता. १३) अखेर १० हजार ६९९ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली आहे. हीच नोंदणी(ता. १३ जानेवारी २०२५)अखेर १७ हजार ९९९ हेक्टर होती. त्यामुळे यंदा ७,३०० हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत तुलनेत कमी नोंदणी दिसून येत आहे..Grape Export: द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी घटणार.खरड छाटणी झाल्यानंतर मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे सूक्ष्म घडनिर्मितीसाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला नव्हता. सुरुवातीला अतिवृष्टी व संततधार पाऊस, तर नंतर बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष बागांच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान समोर आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी यंदा द्राक्षहंगाम उभा केला आहे. मात्र उत्पादनात मोठी घट असून त्याचे परिणाम सुरुवातीपासूनच दिसून येत आहेत. भारताची निर्यात सुरू झाली असली तरी दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष युरोपियन बाजारात दाखल झाले असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. ही द्राक्ष भारतीय द्राक्षांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची संधी मिळाली आहे..गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती (कंटेनर/टन ता.१० जानेवारीअखेर)वर्ष बिगर युरोप युरोप२४-२५ ३१७/११,२५७ २१/२६६.२४२५-२६ २३०/३,२९२ ३/३७.Sangli Grape Export : सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीचा वाढता आलेख.या देशांत होतेय निर्यातबिगर युरोपियनः रशिया, मलेशिया, सौदी अरेबिया, दुबई, चीन, इराक, श्रीलंकायुरोपः नेदरलँड....असे आहेत दर(प्रति किलो रुपये)रंगीत वाण १७० ते १८०सफेद वाण १४० ते १५०.मालाची उपलब्धता कमी असल्याने दर पहिल्यापासून टिकून आहेत. देशांतर्गत चांगले दर मिळत असल्याने निर्यात कमी आहे. यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष निर्यात सुरू झाली ही बाजू सकारात्मक असली तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अपेक्षित निर्यातीचा आकडा गाठला जाणार नाही.–कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने हंगाम लांबणीवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्यात सुरू झाली असली तरी तुलनेत कमी आहे. मालाची उपलब्धता कमी असल्याने युरोपात निर्यात कमी होईल. मात्र इतर देशात व बाजारात तो पुरवठा होताना दर टिकून राहतील.–विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.