Sangli News: मागील काही वर्षांपासून आगाप द्राक्ष फळ छाटणी (गोडी) नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडत आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाल्याने आगाप फळ छाटणीला ब्रेक लागला आहे. सद्यःस्थितीला एकूण क्षेत्राच्या अंदाजे दोन टक्के म्हणजे ८ हजार हेक्टरवर फळ छाटणी झाली असल्याचा दावा द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे. फळ छाटणी एक महिना लांबणीवर पडली आहे. .राज्यात सुमारे ४ लाख एकरांवर द्राक्ष पीक विस्तारले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, बागलाण, देवळा आणि चांदवड या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात प्रामुख्याने आगाप फळ छाटणीचे नियोजन ऑगस्ट महिन्यात शेतकरी करतात. गतवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुमारे १५ ते २० टक्क्यांपर्यंत फळ छाटणी झाली होती. या काळातही पाऊस झाल्याने द्राक्षाचे नुकसानही झाले होते..Grape Farming : दोन दशकांपासून ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्ष उत्पादनातून साधली प्रगती.ऑगस्ट महिन्यात पावसामुळे आगाप फळ छाटणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बहुतांश भागात सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी फळ छाटणीही केली आहे. मात्र, त्यानंतर सलग पाऊस सुरू झाला. त्यामुळे फळ छाटणीला पावसाचा अडथळा निर्माण झाला. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काही भागातील बागा फुलोरावस्थेतही आल्या आहेत..वास्तविक पाहता, दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यापासून फळ छाटणीला गती येते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आगाप फळ छाटणी घेतलेल्या बागांना पावसाचा मोठा फटका बसू लागला आहे. परिणामी फळकुज यासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगाप फळ छाटणी करण्याचे वेळापत्रक बदलले आहे. या साऱ्यामुळे यंदाच्या हंगामात आगाप फळ छाटणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे..सप्टेंबरच्या अखेरीस गती येण्याची शक्यताराज्यभरात द्राक्ष छाटणीला फारशी गती आली नाही. एकंदर वातावरणातील बदल लक्षात घेऊनच फळ छाटणीचे नियोजन केले जाणार असून आठ ते पंधरा दिवसांत बिहारमधून फळ छाटणीसाठी मजूर दाखल होतील, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपासून फळ छाटणीला गती येईल. विभागात एकाचवेळी छाटणी होण्याची शक्यताही आहे..Grape Farming Fund: द्राक्षशेतीला निधी देण्यास आढेवेढे घेणार नाही: उपमुख्यमंत्री पवार.उत्पादन कमी होण्याचा अंदाजराज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच पोषक वातावरण नव्हते. या दुहेरी संकटाचा फटका द्राक्ष पिकाला बसला. परिणामी गर्भधारणा आणि फळधारणा होण्यास अडथळे निर्माण झाला आहे. यामुळे सर्व विभागातील द्राक्षाचे उत्पादनात ३० टक्के घट होईल, असाही अंदाज द्राक्ष उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.....असे असते फळ छाटणीचे नियोजनजून ते सप्टेंबर : सांगली, नाशिक व पुणे विभागजून, जुलै : नाशिक विभागातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगावऑगस्ट ते सप्टेंबर : नाशिक (निफाड, दिंडोरी, नाशिक) सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा पूर्व भाग व पुणे विभाग.द्राक्ष पीकस्थितीसर्वच विभागात उत्पादनात ३० टक्के घट शक्य.फळ छाटणीचे नियोजन कोलमडले.पीक संरक्षण खर्च वाढला.पीक वाचविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त..नैसर्गिक संकटामुळे आगाप फळ छाटणी घेण्याचे प्रमाण कमी होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे नवीन वाण आहेत. त्यामुळे पावसाचा फारसा परिणाम झाला नाही. एकाच वेळी छाटणी झाली, तरी दर चांगले मिळतील, असा अंदाज आहे.मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र, द्राक्ष बागायतदार संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.