Parbhani News: कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये मंगळवार (ता. २०) पर्यंतपरभणी जिल्ह्यात २ हजार १५ शेतकऱ्यांचे १२ कोटी ९४ लाख २९ हजार ८०० रुपये अनुदान प्रलंबित आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे अनुदान वाटप रखडले आहे. ट्रॅक्टर व इतर अवजारे खरेदी करून मोठा कालावधी उलटला, तरी अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत..कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण व राज्य पुरस्कृत राज्य कृषी यांत्रिकीकरण या योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कम्बाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलित अवजारे, मनुष्यच स्वयंचलित अवजारे, अवजारे बँक व उच्च तंत्रज्ञान केंद्र उभारणी आदीकरिता अनुदान दिले जाते..Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी पाच वर्षांची अट.परभणी जिल्ह्यात या अंतर्गत १ लाख ४० हजार ६२० शेतकऱ्यांच्या अर्जांना ८६२ कोटी ८८ लाख ८० हजार ९४२ रुपये अनुदानासाठी पूर्वसंमती देण्यात आली. पूर्वसंमतीनंतर देयक अपलोड करण्याकरिता ८ हजार ३२१ अर्ज आले. त्यासाठी ५१ कोटी ४४ लाख ३५ हजार ४०० रुपये अनुदान मान्यता आहे. अधिकारी स्तरावर तपासणीसाठी असलेले १ हजार ४८७ अर्ज आहेत..Agriculture Mechanization Scheme: अवजारे अनुदानातील कमाल मर्यादा हटविली.७.४० कोटी अनुदान वाटप...या अंतर्गत सर्व ९ तालुक्यांतील १ हजार ५३३ शेतकऱ्यांना ७ कोटी ४० लाख ७० हजार २५० रुपये अनुदान वाटप झाले आहे. त्यात परभणी तालुक्यात २६९ शेतकऱ्यांना १ कोटी ५ लाख ३५ हजार ३०० रुपये, जिंतूर तालुक्यात १८० शेतकऱ्यांना १ कोटी १ लाख ६६ हजार ४०० रुपये, सेलू तालुक्यात २७२ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख १४ हजार १०० रुपये, मानवत तालुक्यात २९८ शेतकऱ्यांना १ कोटी ३९ लाख ७५ हजार २५० रुपये, .पाथरी तालुक्यात ८८ शेतकऱ्यांना ६६ लाख १२ हजार २०० रुपये, सोनपेठ तालुक्यात ८५ शेतकऱ्यांना ३६ लाख ९२ हजार ८०० रुपये, गंगाखेड तालुक्यातील ५२ शेतकऱ्यांना २२ लाख ८९ हजार रुपये, पालम तालुक्यात १७३ शेतकऱ्यांना ७६ लाख ४३ हजार रुपये, पूर्णा तालुक्यात ११६ शेतकऱ्यांना ६५ लाख ४१ हजार रुपये अनुदान वाटप झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.