Nanded News: यंदा पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात साडेतील लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात तब्बल अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरला आहे. गव्हाचे पेरणी क्षेत्रही सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. यंदा ज्वारी, गहू, मका, करडईच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बीमध्ये विक्रमी पेरा होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली. .नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पाच महिन्यातच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३८ टक्के पाऊस झाला आहे. या तुफान पावसामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. परिणामी जमिनीतील जलस्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ३२ हजार ४१५ हेक्टर आहे. या तुलनेत आतापर्यंत १०८ टक्क्यांनुसार तीन लाख ५८ हजार ८२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ५१ हजार ४८५.Chana Sowing: पुणे विभागात हरभऱ्याची दीड लाख हेक्टरवर पेरणी .हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. यासोबतच गहू ४७ हजार ६८ हेक्टर, रब्बी ज्वारी ३२ हजार २७६ हेक्टर, करडई सहा हजार ९०१ हेक्टर, रब्बी मका १३ हजार ८९३ हेक्टर, रब्बी तीळ ३३ हेक्टर, रब्बी सूर्यफूल ६८हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली..Chana Sowing: सहा तालुक्यांमध्ये हरभऱ्याचा सरासरीपेक्षा जास्त पेरा .मका, करडईच्या पेऱ्यात वाढरब्बी मका पिकाची पेरणी १३,८९३ हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. तेलबिया पिकांमध्ये करडई पिकाची पेरणी ६,९०१ हेक्टरवर झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १४३ टक्के वाढ नोंदवली आहे. सूर्यफूल, जवस आणि तीळ या पिकांमध्ये मात्र चढ-उतार दिसून येतो..रब्बीमधील नियोजित पेरणी क्षेत्रहरभरा ः दोन लाख ५१ हजार ४८५ हेक्टरगहू ः ४७ हजार ६८ हेक्टररब्बी ज्वारी ः ३७ हजार २७६ हेक्टररब्बी मका ः १३ हजार ८९३ हेक्टरकरडई ः सहा हजार ९०१ हेक्टरएकूण : तीन लाख ५८ हजार ८२८ हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.