Pune News: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या पेरणीला वेग आला आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी २ लाख ४ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ५८ हजार ६४० हेक्टर म्हणजेच सुमारे ७७ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या बहुतांश भागात पीक उगवून वाढीच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे..हरभऱ्याला बाजारात समाधानकारक दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा वाढला आहे. पुणे विभागात यंदाही ज्वारी, गहू आणि हरभरा या प्रमुख रब्बी पिकांची पेरणी झाली असून, त्यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र लक्षणीय आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘विजय’ व ‘विशाल’ या सुधारित वाणांची मोठ्या प्रमाणावर निवड केली आहे..यंदा पावसामुळे अनेक भागात खरीप पिकांचे नुकसान झाले असतानाही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत पीक कर्जाच्या सहाय्याने रब्बी हंगामाची तयारी केली. बैलजोडी व ट्रॅक्टरच्या मदतीने पेरण्या करण्यात आल्या आहेत. ज्या भागात पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, तेथे पेरणीचे प्रमाण चांगले आहे; मात्र ज्या ठिकाणी जमिनीत ओल कमी आहे, तेथे पेरण्या तुलनेने कमी झाल्या आहेत..Chana Sowing: हरभऱ्याचे क्षेत्र पावणेदोन लाख हेक्टरवर.पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि पुरंदर तालुक्यांत तुलनेने जास्त पेरणी झाली आहे. जुन्नर तालुक्यात सरासरी ४ हजार १४० हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार ७८९ हेक्टर म्हणजेच ६७ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली असून, पेरणी झालेल्या भागात हरभरा चांगल्या स्थितीत आहे. एकूणच, पुणे विभागात हरभऱ्याची पेरणी समाधानकारक असून पुढील काळात हवामान अनुकूल राहिल्यास उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..Chana Wheat Sowing : रब्बीत हरभरा, गहू, भात लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; एकूण कडधान्याची पेरणी पडली पिछाडीवर .सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरी २० हजार ८० हेक्टरच्या तुलनेत २५ हजार ६४१ हेक्टर म्हणजेच १२८ टक्के पेरणी झाली आहे. दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि मंगळवेढा या तालुक्यांतही समाधानकारक पेरणी झाली आहे. मात्र माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांत काही प्रमाणात घट दिसून येत आहे..नगर जिल्ह्यात नगर तालुक्यात सरासरी १० हजार ४९ हेक्टरच्या तुलनेत ११ हजार ५०१ हेक्टर म्हणजेच ११४ टक्के पेरणी झाली आहे. पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, शेवगाव आणि राहाता या तालुक्यांत पेरणीचे प्रमाण चांगले असून, राहुरी, नेवासा, श्रीरामपुरात अपेक्षेपेक्षा कमी पेरणी झाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.