Rural Employment: विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निलंगा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी बुधवारपासून (ता. ८) बेमुदत संप सुरू केला आहे. मागण्यांबाबत पंचायत समिती, तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले..दरम्यान, तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी पंचायत समितीसमोर एकत्र येत निदर्शने केली व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या वेळी तालुक्यात अनेक रोजगार सहायक उपस्थित होते. .Govt Employees Strike: राज्यातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर.राज्य ग्रामरोजगार सहायक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात शासनाने ग्रामरोजगार सहायकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता लागू करावा, याशिवाय ग्रामरोजगार सहायकांना विमा संरक्षण द्यावे, .Fishermen Protest: मच्छीमार संस्थांचे मागण्यांसाठी आंदोलन.तसेच वाढत्या कामाच्या ताणाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. जिओ टॅगिंग, मजुरांची केवायसी, जॉब कार्ड तयार करणे, मस्टर सादर करणे आदी अनेक जबाबदाऱ्या पार पाडूनही अत्यल्प मानधन मिळत असल्याने सेवकांमध्ये नाराजी वाढली असल्याचे संघटनेने नमूद केले..गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार करत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.