Nashik News: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मंगळवार (ता. १३) रोजी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. .या बैठकीत अभियानास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अंमलबजावणीस गती देण्याबरोबरच गावपातळीवरील प्रशासन अधिक लोकाभिमुख, सक्षम व पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. शंभर टक्के करवसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा गौरव होणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले..Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा.बैठकीदरम्यान सुशासनयुक्त पंचायत, लोकाभिमुख व सक्षम पंचायत प्रशासन निर्माण करणे, तसेच ‘सक्षम पंचायत’ या संकल्पनेअंतर्गत स्वनिधी, सामाजिकदायित्वनिधी व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव उभारणी ही प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांचे अभिसरण करून अधिकाधिक लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या..Samruddha Panchayatraj: ‘टॅक्स’मध्ये नागरिकांना ५० टक्के सूट.शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा लवकरच जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. .यावेळी श्री. पवार यांनी प्रत्येक मंगळवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ,तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.