Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची यंदाही हरभऱ्याला सर्वाधिक पसंती असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली आहे. यंदाच्या (२०२५) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. २)पर्यंत परभणी जिल्ह्यात १ लाख ७४ हजार १५५ हेक्टर (१२९.१६ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात १ लाख १४५ हजार ७९० हेक्टर (१२०.४३ टक्के) असे एकूण ३ लाख १९ हजार ९४५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यातील १४ पैकी १२ तालुक्यांत हरभऱ्याचा सरासरीहून अधिक पेरा झाला आहे..थंडीमुळे हरभरा पिकांची वाढ जोमाने होत आहे.पेरणीच्या कालावधीनुसार पीक वाढीच्या, फुलोरा, घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना यंदा हरभऱ्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. .परभणी जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७० हजार ९७७ हेक्टर असताना २ लाख ९२ हजार २७५ हेक्टरवर (१०७.८६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३४ हजार ८४१ असताना १ लाख ७४ हजार १५५ हेक्टर (१२९.१६ टक्के) पेरणी झाली. सर्व नऊ तालुक्यांत हरभऱ्याची सरासरीहून अधिक पेरा झाला आहे..Chana Sowing: नांदेडला अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरणी .ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी ८५ हजार ५१८ हेक्टर (८७.७४ टक्के), गव्हाची ३४ हजार ९३४ पैकी ३१ हजार १४ हेक्टर (८८.७८ टक्के), मक्याची १ हजार ५०२ पैकी ५१९ हेक्टर (३४.५७ टक्के) पेरणी झाली. करडईची १ हजार ६०२ पैकी ८९९ हेक्टर (५६.०९ टक्के), जवसाची ५५.५४ पैकी १५.३ हेक्टर (२७.५५ टक्के), तिळाची ३२.२४ पैकी १०.२ हेक्टर (३१.६४टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार २२० असतांना २ लाख ५ हजार ३८८ हेक्टरवर (१२१.३७ टक्के) पेरणी झाली आहे. .Chana Sowing: पुणे विभागात हरभऱ्याची दीड लाख हेक्टरवर पेरणी .त्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २१ हजार ६२ असताना १ लाख ४५ हजार ७९० हेक्टर (१२०.४३ टक्के) पेरणी झाली. तीन तालुक्यात हरभऱ्याची सरासरीहून अधिक पेरा झाला आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ९ हजार ५६७ असतांना १६ हजार ६२ हेक्टर (१६७.८८ टक्के), गव्हाचे सरासरी क्षेत्र ३३ हजार ४६९ असताना ३८ हजार ९५९ हेक्टर (११६.४ टक्के), मक्याचे सरासरी क्षेत्र ८६७ हेक्टर असतांना १ हजार १११ हेक्टर (१२८ टक्के) पेरणी झाली..करडईची २ हजार ५२ पैकी १ हजार ९७७ हेक्टर (९६.३० टक्के), जवसाची ४३० हेक्टर, तीळाची १५६ हेक्टर, सूर्यफुलाची ५० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.