Akola News: रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभऱ्याच्या लागवडीत अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत यावर्षी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मररोगाचा वाढता प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा त्रास, हवामान बदल आणि घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी दोन्ही जिल्ह्यांत हरभऱ्याची लागवड सरासरी क्षेत्रापर्यंतही पोहोचू शकलेली नाही..अकोला जिल्ह्यात यंदा हरभऱ्याची लागवड ९७ हजार ५८३ हेक्टरवर झाली असून, ही लागवड सरासरी १ लाख २ हजार ७३३ हेक्टरच्या केवळ ९५ टक्के आहे. तर वाशीम जिल्ह्यात सरासरी ७४ हजार ६२३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी ६९ हजार ७७७ हेक्टरवरच पेरणी आटोपली आहे. .Chana Cultivation: अठ्ठावीस लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड.मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यांत शेतकरी रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्या अपेक्षांना मर्यादा येत असल्याचे चित्र आहे..Chana Cultivation : रब्बी हरभरा पिकासाठी ६१ मंडले अधिसूचित.हवामानातील बदल, पावसाचे अनियमित स्वरूप, तसेच हरभरा पिकासाठी वर्षानुवर्षे पारंपरिक वाणच उपलब्ध असल्याने उत्पादनात फारशी वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच दरवर्षी मररोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक भागांत या रोगामुळे संपूर्ण शेतातील पीक वाळून जाते, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो..याशिवाय बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी यासह उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. पीक तोट्याचे! वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन आणि बाजारभाव मिळत नसल्याने हरभरा पिकाचा आर्थिक ताळेबंद शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी पर्यायी पिकांकडे वळण्याचा विचार करत असल्याचेही चित्र अकोला व वाशीम जिल्ह्यांत दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.