Onion Auction Price Transparency: ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत सुरू असलेल्या बफर स्टॉक कांदा खरेदीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. खरेदी केंद्रांवर ‘ए’ ग्रेडच्या नावाखाली लादण्यात आलेले किचकट निकष आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत..सुरुवातीला बफर स्टॉकसाठी केवळ ‘ए’ ग्रेड कांद्याची खरेदी केली जात होती. मात्र, पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने २ जूनपासून दुय्यम प्रतीच्या कांद्याला ‘यूआरएस’ ग्रेडच्या नावाखाली परवानगी देण्यात आली. जुलै महिन्यात या ग्रेडच्या नावाखाली गुणवत्ताहीन कांद्याची एकूण लक्षांकाच्या ५० टक्क्यांपर्यंत खरेदी करून मोठा गैरव्यवहार झाल्याचे धागेदोरे समोर आले..Onion Procurement: शासकीय कांदा खरेदीवरील संशयाचे धुके गडद.हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्राने २९ जुलैपासून ‘यूआरएस’ ग्रेडमधील खरेदी बंद करून पुन्हा ‘ए’ ग्रेड कांद्याची खरेदी सुरू केली. मात्र, ‘ए’ ग्रेडच्या आड जाचक अटी लादल्या जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरेदीनंतर केंद्रीय वखार महामंडळाकडून किरकोळ कारणांवरून माल नाकारला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे..कांदा खरेदी, प्रतवारी आणि बाजारपेठेचा अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडून अंतिम निर्णय घेतले जात असल्याने गोंधळ वाढल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे..Onion Procurement Scam: कांदा खरेदीत घोटाळा?.सरकारी खरेदीपेक्षा बाजार समित्यांमध्ये अधिक दरसरकारने २९ जुलैपर्यंत २१६० रुपये प्रति क्विंटल असलेला दर वाढवून २३३५ रुपये प्रति क्विंटल केला आहे. म्हणजेच १७५ रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, बाजार समित्यांमध्ये ‘ए’ ग्रेड कांद्याला २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे सरकारी दरवाढीचा गाजावाजा केवळ देखावा ठरला असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे..सरकारचे डोके ठिकाणावर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षात कांदा उत्पादकांना काडीचाही फायदा नाही. नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत सरकारच्या अटी-शर्ती आणि वेळोवेळी निर्णयांमध्ये केलेले बदल या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आमचा ठाम आरोप आहे.भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.उमराणे येथील नाफेड खरेदी केंद्रावर एका पाटीतील कांद्यातून केवळ सात-आठ कांदे तपासले जातात. ४५ ते ५० मिमी आकाराच्या ट्रॉलीतील अवघा २० टक्के कांदाच खरेदी होतो. उर्वरित माल अर्ध्या भावाने बाजारात विकण्याची वेळ येत आहे.काशिनाथ हांडे, शेतकरी, लखमापूर (ता. बागलाण).एकसारखा कांदा असेल तरच खरेदी केली जाईल, अन्यथा उर्वरित माल परत न्यावा किंवा कांदे देऊच नयेत, असे सांगितले जाते. जाचक नियम लावून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे.पृथ्वीराज अहिरे, रानदेवपाडे, ता. देवळा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.