Solapur News : केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार आता प्रत्येक खत विक्रेत्याने एल-वन दर्जाचे बायोमेट्रिक पॉस मशिन वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे, या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचनाही करण्यात आली आहे..कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी ही माहिती दिली असून, यानुसार जुनी एलओप्रकारातील मशिन्स वापरणाऱ्या विक्रेत्यांना खत विक्री करण्यास मनाई करण्यात येणार आहे. .Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ.केंद्रीय खत विभागाने UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खत विक्रीसाठी अधिक सुरक्षित एल-वन फिंगरप्रिंट पॅासमशिन वापरण्याचे आदेश दिले आहेत. जुनी एलओ प्रकारातील यंत्रणांना आता मान्यता नाही, असे सांगण्यात आले आहे..मशिन मोफत मिळणारकृषी आयुक्तालयाने जिल्हानिहाय विक्रेत्यांची यादी तयार केली असून, संबंधित खत उत्पादक कंपन्यांकडून एल-वन मशिन्स मोफत दिली जात आहेत. विक्रेत्यांनी तात्काळ मशिन प्राप्त करून ती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. .Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर.आयएफएमएस प्रणालीत रिअल टाइम नोंद आवश्यक खत विक्रीची नोंद प्रणालीमध्ये आयएफएमएस रिअल टाइममध्ये होणे आवश्यक आहे. ई-पॉसवरील साठा व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. .मशिन वितरण व इतर माहितीसाठी विक्रेत्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.