Pune News: राज्य सरकारने मंगळवारी (ता. ४) रब्बी अनुदानासाठी ७ हजार ८४५ कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली आहे. यात मराठवाड्यात सर्वाधिक ४ हजार ४८६ कोटी रुपये वाटप होणार आहेत. तर विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार ५४४ कोटी रुपये वाटप होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. .मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एनडीआरएफ’च्या मदतीव्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मंजूर केले होते. वेगवगेळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता अनुदान मंजूर करत आहे. राज्य सरकारने मंगळवारी (ता. ४) शासन आदेश काढत २८ जिल्ह्यांसाठी ७ हजार ८४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. .Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित.मराठवाड्यातील जिल्हानिहाय अनुदानछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६०८ कोटी ९५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात ३४१ कोटी २८ लाख रुपये, नांदेड जिल्हा ७२७ कोटी ९३ लाख रुपये, बीड जिल्ह्यात ७०८ कोटी रुपये, जालना जिल्ह्यात ४६१ कोटी ५१ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यात ५७७ कोटी ५४ लाख रुपये, लातूर जिल्हात ५६५ कोटी ५८ लाख रुपये, परभणी जिल्ह्यात ४९५ कोटी रुपये अनुदान वाटप होणार आहे..विदर्भात जिल्हानिहाय मंजूर अनुदानअमरावती जिल्ह्यात १८६ कोटी ९० लाख रुपये रब्बी अनुदान वाटपास सरकारने मंजुरी दिली आहे. अकोला जिल्ह्यात ३२३ कोटी ४९ लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यात ६३८ कोटी १५ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यात ६१० कोटी ५७ लाख रुपये, वाशीम जिल्ह्यात २७५ कोटी ३० लाख रुपये, नागपूर जिल्ह्यात ९२ कोटी ८१ लाख रुपये, भंडारा जिल्ह्यात ९ कोटी ४ लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यात २ कोटी ५६ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यात ११० कोटी ३० लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यात १३ कोटी २६ लाख रुपये, वर्धा जिल्ह्यात २८२ कोटी ३१ लाख रुपयांचे रब्बी अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे..Rabbi Anudan GR : यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६३८ कोटींचे अनुदान मिळणार.कोकणात २९ कोटी मंजूरकोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार आहे. यात रायगड जिल्ह्यात ६ कोटी २ लाख रुपये, पालघर जिल्ह्यात १३ कोटी ७४ लाख रुपये, ठाणे जिल्ह्यात ९ कोटी ४८ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यात २६ लाख ७० हजार रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ लाख ९० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे..पुणे विभागातील रब्बी अनुदानपुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५२ कोटी रुपये अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यात २३ कोटी ३४ लाख रुपये, सांगली जिल्ह्यात ९९ कोटी रुपये, कोल्हापूर जिल्हात १० कोटी ८८ लाख रुपये अनुदान वाटपास मंजुरी मिळाली आहे..मंजूर अनुदान (कोटी रुपयांत)मराठवाडा ४४८६विदर्भ २५४४पुणे विभाग ७८५कोकण ९.६८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.