Govindswamy Kidney Trafficking Investigation: आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणातील फरार आरोपी डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी याच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस आणि अटक वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर देशभरातील विमानतळ, बंदरे आणि सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे..या प्रकरणाच्या तपासात दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग आणि तमिळनाडूतील त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांची भूमिका संशयाच्या केंद्रस्थानी आहे. डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान त्यांनी आपण केवळ सल्लागार म्हणून काम केले असून प्रत्यक्ष शस्त्रक्रियांशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मात्र तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने विविध दुव्यांची स्वतंत्र पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे..Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा.दरम्यान, फरार डॉ. गोविंदस्वामी याला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन वेळा तमिळनाडूत गेले होते. मात्र आरोपीचा ठावठिकाणा न लागल्याने कारवाईला यश आले नाही. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला असून, त्याच्याविरोधातील कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे..Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या.लुकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर आरोपीची माहिती देशातील सर्व विमानतळ, सागरी बंदरे आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांना पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे देशाबाहेर पळून जाण्याचा अथवा अन्यत्र स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तातडीने ताब्यात घेणे शक्य होणार आहे..‘‘फरार आरोपीविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला, तरी दुसरा आरोपी अद्याप फरार असल्याने तपास यंत्रणांचे लक्ष आता गोविंदस्वामीच्या अटकेवर केंद्रित झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.