Agriculture University: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदके पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे..महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी सुभाष थोरात हिने बीएससी (कृषी) अभ्यासक्रमात डॉ. बी.एस.के.के.व्ही. दापोलीअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केले. या तिच्या अजोड कामगिरीबद्दल तिला मानाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तिने संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकवला. .Agriculture College: बारामती कृषी महाविद्यालयात ‘आविष्कार-२०२५’चे आयोजन.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे दर्शन घडवले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थिनी समीक्षा सुरेश बोने हिने देखील कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्कृष्ट यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हिने एमएससी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी सुवर्ण पदक पटकावले आहे. .Nagpur Agriculture College: नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीला नूतनीकरणाची प्रतीक्षा.वैष्णवी पाटील हिने गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे..संस्थापक कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थिनींना सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिन्हीही सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.