Nandurbar News: केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेजबाबदारपणा दाखवत आहे. देशातील शेती व्यवसायाची अधोगती होत चालली आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी ढीगभर शेतकऱ्यांच्या माथी चुकीच्या धोरणांचा वरवंटा फिरवला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शहादा (जि. नंदुरबार) येथे शेतकरी मेळाव्यात केली. .श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, महापूर, अस्मानी व सुल्तानी संकटे, नैसर्गिक आपत्तीने खचला आहे..Farmers Rights: ‘क्रांतिकारी शेतकरी’ पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी.राज्यामध्ये रोज आठपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये अधिवेशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधान भवानाच्या पायऱ्यांवर माथा टेकून अंर्तमुख व्हावे. .Farmers Rights: आठव्या वेतन आयोगाच्या वेळी स्वामिनाथन आयोगाचा विचार करा: विजय जावंधिया.त्यांनी राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी आपल्या डोळ्यांसमोर आणावा. अदानीच्या हितासाठी राज्यामध्ये एक लाख कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग केला जात आहे. पण शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी रुपये नाहीत, हे कृषिप्रधान देशाचे दुर्दैव आहे.’’.या वेळी शिवसेनेचे (शिंदे गट) शेतकरी नेते घनश्याम चौधरी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास संघटनेचे मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, अमर कदम, बापू कारंडे, नत्थू पाटील, पवन पटेल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.