थेट शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करावी, केंद्राकडून हॉटेल्सना सूचनापुरवठा साखळीतून मध्यस्थांना वगळले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल शेतकऱ्यांकडून खाद्यपदार्थ, भाजीपाला, मसाले आणि इतर गोष्टी खरेदी केल्या तर ते दोन्हीसाठी फायद्याचे ठरेल.Farmer Income: पुरवठा साखळीतून मध्यस्थांना वगळून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या उद्देशाने, केंद्र सरकारने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPOs) थेट शेतमाल खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे..हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ नॉर्दर्न इंडिया आणि कृषी मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी, आदरातिथ्य (hospitality) क्षेत्र आणि स्थानिक शेतकरी यांच्यातील थेट भागीदारीच्या मुद्यांवर भर दिला. जेणेकरुन याचा शेतकऱ्यांना फायदा होईल..Farmer Problems: शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च-उत्पन्नाचे गणित जुळता जुळेना."देशात मोठ्या संख्येने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. जर तुम्ही स्थानिक शेतकरी गटाशी भागीदारी करू शकलात आणि त्यांच्याकडून खाद्यपदार्थ, भाजीपाला, मसाले आणि इतर गोष्टी खरेदी केल्या तर ते दोन्हीसाठी फायद्याचे ठरेल," असे चतुर्वेदी म्हणाले..Farmer Tourism: शेतकऱ्यांचे पर्यटन: बैलगाडी ते विमान.पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा स्वाद घेता यावा, यासाठी त्यांनी हॉटेल्सना भौगोलिक मानांकन (GI) टॅग असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन केले. भारतात बासमती तांदळाव्यतिरिक्त अनेक नोंदणीकृत जीआय टॅग असलेले खाद्य उत्पादने आहेत. त्यात भाजीपाला, फळे, धान्ये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा समावेश आहे.."मी अशीही विनंती करेन की, जर तुम्ही तुमच्या पाककृतींमध्ये देशभरातील जीआय उत्पादनांचा वापर केला तर मला खात्री आहे की अनेक पर्यटकांकडून त्याला पसंती मिळेल. त्यांना आपल्या देशाचा जीआय वारसा जाणून घेता येईल," असे चतुर्वेदी पुढे म्हणाले..भारतात सध्या सुमारे ३५ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आहेत. यातील १० हजार कंपन्यांची स्थापना सरकारी योजनांअंतर्गत करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. कृषी मंत्रालयाने एक वेब आधारित सुविधा सुरू करण्याची योजना आखली आहे; ज्यामुळे व्यवसाय, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससना शेतमालाची थेट खरेदी व्हावी, यासाठी एफपीओ अतिरिक्त उत्पादनाची नोंदणी करू शकतील.."हॉटेल आणि रेस्टॉरंट स्थानिक मंडई अथवा काही किरकोळ विक्रेत्यांकडून फळे, भाजीपाला, मसाले आणि धान्यांची खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना विनंती करत आहोत की त्यांनी थेट एफपीओंकडून शेतमाल उत्पादनांची खरेदी सुरू करावी..शेतीचे आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, शेती क्षेत्राचे भारताच्या जीडीपीमधील योगदान १८ टक्के आहे. यावर ४६ टक्के कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. तरीही शेतीतून मिळणारे उत्पन्न हे क्षेत्रांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. .चतुर्वेदी यांनी कीडनाशकमुक्त आणि सेंद्रिय शेतमालाची वाढती मागणी लक्षात घेता, त्यांनी सुचित केले की सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतीतून उत्पादन घेणारे शेतकऱ्यांचे गट हॉटेल्सशी जोडले जाऊ शकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.