Nashik News: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत खरेदी केलेला ‘बफर स्टॉक’मधील कांदा ४ ऑगस्टपासून देशातील प्रमुख महानगरांमध्ये विक्रीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रति किलो २४, तर आता २१ रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू केली आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याबाबत गाजावाजा व जाहिरातबाजी करून कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्याने या मुद्द्यावर संताप व्यक्त केला जात आहे. .महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतून जुलै व ऑगस्ट महिन्यांत ३ लाख टन कांद्याची खरेदी आटोपण्यात आली. तर हा बफर साठ्यातील कांदा आता टप्प्याटप्प्याने ४ सप्टेंबरपासून बाजारात आणला जात आहे. सुरुवातीला दिल्ली, मुंबई व अहमदाबाद अशा शहरांनंतर आता गुवाहाटी, चेन्नई, चंडीगड व कोलकाता या शहरांसाठी कांदा पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात महागाई नसताना ‘‘महंगाई पर एनसीसीएफ का सिधा वार, अब दिल्ली और मुंबई में प्याज केवल रुपये २१ किलो’’ अशा संताप आणणाऱ्या जाहिराती समाज माध्यमांवर केल्या जात आहेत..Onion Market : लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याची आवक.राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात कांद्याच्या दारात मोठी घसरण असून उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत केंद्राने ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच दराची ओरड नसताना कांदा विक्रीस सुरुवात केली. प्रति किलो १४ ते १६ रुपये दरम्यान खरेदी झाली आणि २४ रुपयांप्रमाणे म्हणजेच दीड पट दराने ही विक्री सुरू होती. तर आता किलोमागे ३ रुपये दर कमी करून विक्रीचा धडाका लावला आहे..एकीकडे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी, शेतकरी संघटना, विविध पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. मात्र अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च वसूल होईल याकडे दुर्लक्ष करून फक्त ग्राहकांना तो स्वस्त दरात कांदा कसा उपलब्ध होईल या अजेंड्यावरच काम करत असल्याचे सध्याचे चित्र आहे..Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे मौन, विरोधक राजकीय पोळ्या भाजण्यात व्यस्त ः दिघोळे.कांद्याच्या मुद्द्यावर केंद्र टीकेचे धनीकांद्याला प्रति किलो ५ ते १० रुपये इतका नीचांकी बाजारभाव मिळत असताना सरकारी खरेदीतील बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव अजूनच कमी होत आहेत. देशामध्ये सर्व काही महाग झाले तरी चालते; परंतु कांदा आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल स्वस्तातच मिळाला पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली..शेतकऱ्यांचा कांदा सरकारने पडत्या दरात खरेदी केला. आता बाजारातील दर पाडण्यासाठी तोच कांदा विक्री करीत आहे. अशा हस्तक्षेपामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या सरकारचा हा दुटप्पीपणा आहे.किरण मोरे, शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.