Direct Recruitment Maharashtra: महाराष्ट्र सरकारने सरळसेवा पदभरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरळसेवा पदभरतीसाठी लागू असलेल्या छोट्या संवर्गाच्या बिंदुनामावलीचे पुनर्विलोकन करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सरळसेवा पदभरतीमध्ये छोट्या संवर्गातील पदे भरण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या बिंदूनामावलीचे पुनर्विलोकन करून उपाययोजना सुचविणे. तसेच त्यानुसार ही समिती शासनास अहवाल सादर करणार आहे. .या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. सरळसेवा पदभरतीसाठी छोट्या संवर्गातील पदभरतीसाठी बिंदुनामावली निश्चित केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची ५२ वी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत छोट्या संवर्गाच्या बिंदुनामावलीच्या अनुषंगाने सर्व राखीव प्रवर्गांना योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने एक समिती नेमावी. तसेच त्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेऊन बिंदुनामावलीचे पुनर्विलोकन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार पुढील कार्यवाही करत यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे..Recruitment Exam Reform: भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना.अशी आहे समितीअध्यक्ष- मुख्य सचिव, सदस्य- डॉ. हेमंत सावरा (लोकसभा खासदार), राजेंद्र गावित (विधानसभा आमदार), राजू तोडसाम (विधानसभा आमदार), अपर मुख्य सचिव-सेवा (सामान्य प्रशासन विभाग), प्रधान सचिव (विधि व न्याय विभाग), प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग), सचिव (आदिवासी विकास विभाग), सदस्य सचिव- सचिव-साविस (सामान्य प्रशासन विभाग). .DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वाढीव महागाई भत्ता ७ महिन्यांच्या थकबाकीसह मिळणार.छोट्या संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी खुल्या व राखीव प्रवर्गाच्या आरक्षणाची प्रचलित टक्केवारी विचारात घ्यावी. त्यानुसार ही समिती समन्यायी (Equitable) पद्धतीने सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी बिंदुनामावली सुधारित करण्याबाबत शासनास उपाययोजना सुचवेल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.