Mumbai News: महाराष्ट्रातील शेतकरी हा सरकारचा महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात विचार करत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केले आहे. कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल. त्यासाठी आमची समिती काम करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २) दिली..मुंबईतील प्रभादेवी येथील ‘सकाळ’च्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत कर्जमाफी, वन्यप्राणी आणि मानव संघर्ष या अनुषंगाने त्यांनी मते व्यक्त केली..Farmer Loan Waiver : कर्जमाफी निश्चित करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आश्वासन; अटी-शर्तीच्या पाचरीचे संकेत.श्री. फडणवीस म्हणाले, की कर्जमाफीचे नियम, निकष काय असले पाहिजेत, त्यावर सरकारची समिती काम करत आहे. आजवरच्या कर्जमाफीमध्ये अंतिमतः शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही. बँकांना फायदा जास्त होतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातून काही काळ बाहेर कसे काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल..त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली समिती काम करते आहे. आपण २०१७ ला कर्जमाफी केली. २०२० ला कर्जमाफी केली. इतक्या लवकर कर्जमाफी करायची वेळ येते तेव्हा व्यवस्था कुठेतरी चुकते आहे. या व्यवस्थेला योग्य पद्धतीने कसे वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीने त्याची तयारी करत आहे..Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही.वन्य प्राण्यांच्या संवर्धनामुळे संख्या वाढलीश्री. फडणवीस पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात सगळीकडेच बिबटे वाढलेले दिसत आहेत. पूर्व विदर्भामध्ये वाघाचा जास्त प्रकोप पाहायला मिळतोय. याचे कारण, गेली काही वर्षे प्राण्यांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले. खूप कडक अशा प्रकारचे नियम आणले. त्याचे संवर्धन केले. त्यामुळे आता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही संख्या वाढल्यानंतर आव्हानेही वाढली आहेत. कोअर झोन आणि बफरझोन आहे, तिथेही टायगर झोन तयार झालेला आहे. पण संख्या वाढत राहिली तर आपल्याला ग्रासलँड तयार करावी लागेल. वाघ ज्या इकोसिस्टीममध्ये राहतो, त्यासाठी पोषक वातावरण तयार करावे लागेल..बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटरबिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना ज्या वेळी भक्ष्याची कमतरता पडते किंवा त्यांना आवश्यक ते खाद्य मिळत नाही, त्या वेळी ते शहरात जातात आणि हल्ले होतात. त्यामुळे आता आपल्याला एकतर वनीकरण वाढवून ती व्यवस्था करावी लागेल. ते वनात राहतील; वनाच्या बाहेरचे जे आहेत, ते पकडावे लागतील. आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो आहोत. माणसाचे जीवन हे अधिक महत्त्वाचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.