Agriculture Apps : पालघर डोंगरी भागातील अनेक गावांत मोबाईलला नेटवर्क नाही, नव्या डिजिटल प्रणालीचे पुरेसे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशा परिस्थितीत २५ ऑगस्टपासून खत खरेदीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल प्रणाली वापरण्याच्या सक्तीमुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे..एकीकडे कृषी विभागाकडून प्रशिक्षण दिल्याचा दावा होत असताना दुसरीकडे गावांतील शेतकरी प्रणालीपासून अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे खताचा काळाबाजार रोखण्याच्या नावाखाली खतापासून शेतकऱ्यांना दूर ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत शेतकरी थेट कृषी केंद्रावर जाऊन गरजेनुसार खताची मागणी करीत होते. पण अॅपने नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे मोखाडा, जव्हारसारख्या दुर्गम भागात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे..Protect Sugarcane Farmers: ऊस कडू झाला, साखर गोड झाली!.नोंदवलेले आक्षेपग्रामसभा, कृषी सहाय्यक आणि गावपातळीवर शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना व्यापक प्रशिक्षण दिल्याचा दावा कृषी विभाग करत आहे. काही तालुक्यांतील अनेक गावांपर्यंत शिक्षणाची माहिती पोहोचलेली नाही..Hortimax Farmers Producers Company: कांदा, सोयाबीनमध्ये ‘हॉर्टिमॅक्स’ने तयार केली मूल्यसाखळी.शेतकऱ्यांच्या अडचणीत भरजिल्ह्यात १ लाख ५६ हजार १७ नोंदणीकृत शेतकरी आहेत. खरीप हंगामात खताची मागणी १५ हजार ९५० मेट्रिक टन आहे. १२ हजार ८०० मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार मेट्रिक टन खतांचे वितरण झाले आहे. उर्वरित खताची गरज असताना ऐन हंगामात नव्या प्रणालीची सक्तीने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे..कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीक, क्षेत्रफळाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदानित युरिया आणि डीएपी खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठरवून दिलेल्या क्षेत्रफळानुसार अनुदानित खत खरेदी केले..ग्रामीण भागात नेटवर्कपासून अनंत अडचणी आहेत. त्यामुळे खत घेणे खूप कठीण होणार आहे. या गोष्टी प्रशिक्षणाशिवाय समजणे अवघड आहे.- संजय पाटील, शेतकरी, उर्से-डहाणू.खताच्या काळाबाजाराला अॅपमुळे लगाम लागणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा वापर किफायतशीर ठरणार आहे. तसेच यामुळे काळाबाजाराला लगाम लागणार आहे.- सोमनाथ पिंजारी, जिल्हा कृषी अधिकारी, पालघर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.