Government Land Residential Encroachment: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला होता. ही निवासी अतिक्रमणे काही अटींवर नियमित करण्याबाबत महसूल विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे..राज्यातील नागरी क्षेत्रातील अथवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अतिक्रमित जमिनीबाबत जिल्हाधिकारी, संबंधित महानगरपालिका आयुक्त, विशेष नियोजन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिक्षक, भूमिअभिलेख यांची प्रशासकीय समिती पहिल्यांदा अतिक्रमित जागेचा विकास करता येईल का? हे पाहिले जाणार आहे. यासाठी म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांसारख्या संस्थामार्फत अथवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रुप हाऊसिंग योजना राबविणेबाबत सुयोग्यता (फिजिबिलीटी) तपासणी केली जाईल. .Encroachment Regularisation: निवासी अतिक्रमणे नियमित करण्यास सरकारची मंजुरी.प्राधान्याने या संस्थांमार्फत अतिक्रमित जमिनीचा विकास करण्याचे निश्चित करील. असा विकास म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांसारख्या यंत्रणेमार्फत होण्याची शक्यता नसल्यास, समिती ज्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी प्रस्तावित करतील केवळ तीच अतिक्रमणे नियमित करावीत, असे महसूल विभागाने म्हटले आहे..Raigad Land Encroachment: रायगडमध्ये गायरान जमिनींची लूट.महसूल विभागाच्या याआधीच्या शासन निर्णयानुसार, बृहन्मुंबई वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. ज्यांनी केवळ घरांसाठी अतिक्रमण केले आहे आणि जे सध्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, अशा नागरिकांनाच हा नियम लागू राहणार आहे. ५०० चौरस फुटांपर्यंती निवासी अतिक्रमणे कोणत्याही शुल्काविना नियमित केली जाणार आहेत. किमान ५०० ते कमाल १५०० चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.