Mumbai News: पावसाने झोडपल्याने मराठवाड्यातील शेती आणि रहिवासी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. असे होऊनही सरकार अजूनही प्रस्ताव तयार करण्यातच मग्न आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर दोन मंत्रिमंडळ बैठका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन महाराष्ट्र दौरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा होऊनही शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप मदत पडलेली नाही. .मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे राज्यातून विचारणा होत असताना या दोन्ही मंत्र्यांनाही मसुद्याबाबत काहीच माहीत नाही. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रस्तावाबाबत बैठक झाली. मात्र, त्यातील तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारला पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने प्रचंड गोपनीयता पाळली असून त्याबाबत मुख्यमंत्री स्तरावरच निर्णय घेण्यात येणार आहे..सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यभरातील ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. मराठवाड्यातील अभूतपूर्व महापुरामुळे शेती आणि रहिवाशी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी १५ हजार कोटींची गरज असल्याची अनौपचारिक चर्चा मागील मंत्रिमंडळ बैठकीत झाली..मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर २३ आणि ३० सप्टेंबर अशा दोन मंत्रिमंडळ बैठका झाल्या. या बैठकांमध्ये केवळ चर्चेचे गुऱ्हाळ मांडण्यात आले. पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्रिमंडळाला पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचे निर्देश दिले. जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांतील नुकसानीपोटी देण्यात आलेली २२०४ कोटी रुपयांची मदतीचा आकडा सांगून पूरग्रस्तांना मदत केल्याचे सांगितले..Maharashtra Flood : पंचनाम्यांचा सोपस्कार कशासाठी?.मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही केवळ मदतीवरून काथ्याकूट करण्यात आला. केंद्र सरकारने मदत दिल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतीची बांधबंदिस्ती करून पुन्हा मशागतीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज आहे. यासाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी होत आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. .त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र, त्याकडे सरकारने सपशेल दुर्लक्ष केले आहे. राज्यात बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांपाठोपाठ परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. .बीडमध्ये ६ लाख ९९ हजार २९२ हेक्टर, नांदेडमध्ये ६ लाख ५३ हजार ३२४ हेक्टर, अहिल्यानगरमध्ये ५ लाख ६६ हजार ३८४, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ लाख १० हजार ११३, यवतमाळमध्ये ५ लाख १० हजार १०७, लातूरमध्ये ४ लाख ९१ हजार ११७, सोलापुरात ४ लाख ८६ हजार २३, धाराशिवमध्ये ४ लाख ७६ हजार, ५२६, जालन्यात ३ लाख ८८ हजार २०८, परभणीत ३ लाख ६१ हजार ५३७, बुलडाण्यात ३ लाख २२ हजार ७२२ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. हिंगोली, नाशिक, वाशिम या जिल्ह्यांतही तीन ते साडेतीन लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत..Flood Relief : पूरग्रस्तांच्या खात्यावर १३ कोटी जमा.ई-केवायसी होणारराज्यातील १ कोटी ७२ लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी १ कोटी १७ लाख शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी झाली आहे. या शेकऱ्यांचीही ई-केवायसी करण्यात येणार असून उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करून घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री कार्यालयातून देण्यात आली..कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री तोफेच्या तोंडीशेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून चालढकल सुरू असताना तोफेच्या तोंडी मात्र कृषिमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. या दोन्ही मंत्र्यांना राज्यभरातून मदतीबाबत विचारणा होत आहे. मात्र, त्यांच्या हातात काहीच नसल्याने किंबहुना ठेवले नसल्याने त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवावे लागते. त्यामुळे या दोन मंत्र्यांना टिकेचे धनी व्हावे लागत आहे..सर्वच संपले असताना पंचनामे कशाला?संपूर्ण मंत्रिमंडळाने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे. मंत्र्यांशी संपर्क साधला असता शेतीत काहीच शिल्लक नाही असे सांगितले जात आहे. असे असताना पंचनामे करून कागद रंगवण्यात सरकार वेळ काढत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे..अमित शहांचे दोन दौरे आश्वासनांवरअतिवृष्टीने झोडपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन महाराष्ट्र दौरे झाले. मुंबईत गणेश दर्शनासाठी आलेल्या श्री. शहा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन दिले. तर अहिल्यानगर येथे दोन दिवसांपूर्वी दौरा झाला. या दौऱ्यात आश्वासनांवर बोळवण करण्यात आली..प्रस्ताव, पंचनाम्यांचे कागदी घोडे, समित्या यात अडकलो तर शेतकरी वाचणार नाही. सगळ्या मंत्रिमंडळाने दौरा केल्यानंतर त्यांना भीषण परिस्थिती कळाली आहे. शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी शिल्लक राहिला आहे. हेक्टरी ५० हजार मदत आणि सातबारा कोरा करून कर्जमाफीचे आश्वासन सरकारने आता पूर्ण केले पाहिजे.ओमराजे निंबाळकर, खासदार, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.