Solapur News : अतिवृष्टी आणि महापुरामुळे घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या बाधितांना शासनाकडून प्रतिकुटुंब १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून, आजपर्यंत जिल्ह्यातील १३ हजार १९४ नागरिकांच्या खात्यावर १३ कोटी १९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत. .अजून १ कोटी ५० लाख ९० हजार रुपयांची मदत १ हजार ५०९ जणांच्या खात्यावर वर्ग करायची, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. प्रतिकुटुंब दहा हजारांप्रमाणे १४ हजार ७०३ लाभार्थ्यांसाठी १४ कोटी ७० लाख ३० हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाने बँकांमार्फत वितरित केली आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर मदत माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि मंद्रूप परिसरातील पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. .Flood Relief : सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत.यापैकी शिल्लक राहिलेल्या १५०९ जणांमध्ये माढ्यातील १०५०, उत्तर सोलापूरातील ७०, दक्षिण सोलापूर ४३, पंढरपूर ३६ आणि मोहोळमधील ३१० लाभार्थ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर लवकरच मदत जमा केली जाणार आहे..Farmers Flood Relief: पूरग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्नेहवन’ सरसावले .एकीकडे आर्थिक मदत देण्यात आली असताना, शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचे वाटपही करण्यात येत आहे. आजपर्यंत ८ हजार ४१० कुटुंबांना ५७४ क्विंटल गहू आणि ५७५ क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले आहे. यामध्ये माढा ७९३, करमाळा ४४४, उत्तर सोलापूर २३६३, दक्षिण सोलापूर २३२६, मोहोळ २०४०, अक्कलकोट १६०, सांगोला ६० आणि बार्शी २२४ कुटुंबांचा समावेश आहे..ठळक मुद्देअतिवृष्टी, महापुरामुळे बाधित शेती क्षेत्र : ४ लाख २९ हजार ०६१ हेक्टरबाधित शेतकरी : ४ लाख ६९ हजार ३०६महापुरामुळे बाधित गावे : ६ तालुक्यातील ९३अतिवृष्टीमुळे बाधित गावे : २ तालुक्यातील २२पूरग्रस्त भागात वाटप केलेला चारा : ४७८ टन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.