Solapur News: सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. .माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव, वाकाव पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट व भाऊबीज भेट वाटप करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘‘स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक, ग्रामस्थ व प्रशासनाने धैर्याने काम केले. आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत मिळेल.’’.Government Subsidy: शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यांसाठीच्या अनुदानात वाढ.दिवाळीसाठी परिपूर्ण कीट तयार करण्यात आले असून, यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये साडी, पॅंट, शर्ट व कीटचेही वाटप करण्यात आले. घरकुलासाठी जागा व वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून, द्राक्षबागांचे पंचनामेही करण्यात येणार आहेत..राज्य शासनाकडून घरांसाठी १.२० लाख तर पंतप्रधान घरकुल योजनेतून २.५० लाख देण्याचा प्रयत्न आहे. रस्ते, पूल दुरुस्ती, विद्युत पंपांचे पुनर्बांधणी, वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, तसेच जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले..Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड.सर्वस्तरातून मदतीचे आश्वासनआमदार अभिजित पाटील यांनी प्राथमिक मदत दिल्याचे सांगत, जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शासनाने दिलेल्या प्राथमिक मदतीबाबत समाधान व्यक्त करत अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली..जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पुरातला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली, विद्युत मोटारीसाठी नुकसानभरपाईची मागणी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वस्तरातून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.