Shetkari Sanghatana : पंढरपूर शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याची सोलापूर जिल्हास्तरीय बैठक नुकतीच पंढरपूर येथे झाली. संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली..या वेळी संघाची ध्येय-धोरणे, उद्देश, आतापर्यंत शेतकरी कल्याणासाठी केलेले कार्य आणि भविष्यातील कामांची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासह शेतीच्या विकासासाठी संघ अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची संघाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली..Rainfall Deficit: अहिल्यानगर जिल्ह्यात सात तालुक्यांत पावसाची मोठी तूट.या बैठकीस सातारा येथून तानाजी धायगुडे, तर अमरावती येथून श्रीकृष्ण रंगाचार्य उपस्थित होते. यांच्यासह समाधान भोसले, सोमनाथ हुलगे, कुबेर रेडे, मुकरंद सरगर, महेश बिस्किटे, सुरेश घाडगे, बाळासाहेब मगर आदी पुरस्कारप्राप्त शेतकरी उपस्थित होते..Crop Failure : पावसाअभावी मका पिकावर नांगर; कोथिंबिरीवरही रोटर फिरविला.सोलापुरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीराज्यस्तरीय सदस्य : शशिकांत शंकर पुदे (कृषी भूषण)राज्यस्तरीय युवा प्रतिनिधी : महेश राजेंद्र पाटीलजिल्हाध्यक्ष : प्रवीण माने (शेती मित्र पुरस्कार).जिल्हा उपाध्यक्ष : खुशालचंद बाबासाहेब मोरे (कृषी भूषण - सेंद्रिय शेती)जिल्हा सचिव : राहुल बनकर (शेती निष्ठा)जिल्हा संघाचे मार्गदर्शक : जगन्नाथ मगर (कृषी भूषण - सेंद्रिय शेती)राज्यस्तरीय सल्लागार : अंकुश पडवळे (कृषी भूषण).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.