Tribal Rights: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि विविध विभागांच्या मंत्र्यांमध्ये मंगळवारी (ता. २७) मंत्रालयात चर्चा झाली. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांचे वनपट्टे कायम करून ताब्यात असलेली जमीन उताऱ्यावर लावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.