भारतीय अर्थकारणामध्ये प्राचीन काळापासून गोधनाची दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पंचगव्य, शेणखत इत्यादी माध्यमातून भरीव योगदानाद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गायीचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी ‘गोवत्स द्वादशी’ म्हणजेच वसू बारस’ हा उत्सव साजरा करण्यात येतो..भारतीय लोकजीवन कृषिक्षेत्राच्या कुशीत विकसित पावले आहे. अनादी काळापासून कृषी आणि पशुपालन यांच्या संयुक्त अनुबंधातून समाज जीवन बदलत गेले आहे. बदलत्या ऋतुचक्रानुसार मानवी आरोग्य, समाजजीवनासाठी अनुरूप आणि उपयुक्त प्रथा परंपरा रूढ झाल्या. शेतकरी बांधवांचा सखा असलेल्या बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जसा श्रावण महिन्यात पोळा साजरा केला जातो, तसाच गायीचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी ‘गोवत्स द्वादशी’ म्हणजेच वसू बारस’ हा उत्सव साजरा करण्यात येतो..Indian Festival : हरवले ते गवसेल का?.वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. वसू बारस या सणाला सवत्स गायीची पूजा करण्यात येते. पाडसासह धेनू ही समृद्धता, संपन्नता आणि सुफलतेचे प्रतीक समजले जाते. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झालेला असतो, शेतातील नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून समृद्धतेचे प्रतीक म्हणून दिवाळी सण साजरा होतो. सर्वांच्या जीवन समृद्धीचे प्रतीक गोपालनात जाणून कृषिवलांसाठी हा आनंदोत्सव ठरतो..वैविध्यपूर्ण भारतीय गोधन :वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेले भारतीय गोधन हा आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. म्हणून वसुबारस हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस खऱ्या अर्थाने संपन्न भारतीय गोसंपदेचा गौरवोत्सव आहे. दिवाळीपूर्वी अनेक पशुपालक ‘वाडगा पूजन’ करतात. पशुधनाच्या गोठ्यास म्हणजे वाडग्यास शेणाने छान सारवून स्वच्छ केले जाते. शेणामातीने सारवताना गोठ्यातील लहानसहान भेगा बुजल्या जातात. त्यात होणारी गोचीड, पिसवांची पैदास प्रतिबंधित होऊन संक्रमक आजारास आळा घातला जातो, कदाचित हे वैज्ञानिक ज्ञान पूर्वजांना असेल म्हणून अशा परंपरांचा जन्म झाला असावा..Indian Dairy Festival : कोल्हापुरात शुक्रवारपासून इंडियन डेअरी फेस्टिव्हल.१) पारंपरिक पशुपालक समाज हा खऱ्या अर्थाने पशुधनाचा संवर्धक आहे. देशी पशुधनामध्ये स्थानिक हवामानात अनुकुलरित्या जुळवून घेण्याची विलक्षण शक्ती निसर्गाने प्रदान केली आहे. त्यांच्यात सकस दूध देण्याची क्षमता असते. याशिवाय निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म देशी पशुधनात आढळतात..२) भौगोलिक वैशिष्ट्यानुसार गोवंशात आनुवंशिक विविधता पाहायला मिळते. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो, कर्नाल (हरियाणा) या संस्थेमार्फत देशभरातील पाळीव पशू नोंदणीचे काम होते. भारतात सध्या शास्त्रीय पातळीवर नोंदणीकृत एकूण ५३ जाती आहेत. महाराष्ट्रात देवणी, डांगी, खिल्लार, गवळाऊ, लाल कंधारी, कोकण कपिला आणि कठाणी अशा सात जाती आढळतात..Diwali Festival २०२५ : यंदाच्या दिवाळीला 'या' वस्तूंची नक्की करा खरेदी.३) अवर्णीत (अज्ञानापोटी गावठी म्हणून गणले जाणारे किंवा ज्यांचे गुणधर्म दुर्लक्षित राहिले आहेत) अशा पशुधनाच्या अभ्यासाचा ‘मिशन शून्य अवर्णीत पशुधन’ हा देशव्यापी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे. प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सर्व्हेक्षण अभ्यासातून नोंदणीकृत नवीन देशी पशुधनाचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत देखील राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो यांच्या साहाय्याने नेटवर्क प्रकल्पांतर्गत देशी पशुधनाच्या विविध जातींचा अभ्यास करण्यात येत आहे..वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि उत्पादनक्षमता असलेले जातिवंत गोधन मात्र आजमितीला अनेक कारणांनी दुर्मीळ झाल्याचे दिसतात. पशुपालक समाजाची भटकी जीवनशैली, व्यावसायिक मानसिकतेतून आणि स्थानिक देशी गोवंशाच्या कमी उत्पादन मर्यादेमुळे अधिक दूध उत्पादनाच्या हव्यासातून केलेले संकरीकरण, यांत्रिकीकरणामुळे बैलांची घटती मागणी, चराई क्षेत्राची कमतरता, लागणारे मनुष्यबळ आणि उत्पादनाचा खर्च अशा अनेक कारणांनीदिवसेंदिवस शुद्ध गुणधर्म असलेल्या जातिवंत गोधनाची संख्या कमी होत आहे. आजही बाजारपेठेत जातिवंत गाय किंवा बैलजोड्या मिळत नसल्याची पशुपालक तक्रार करतात. म्हणूनच जातिवंत देशी पशुधनाचे संवर्धन करणे एक आव्हान आहे..Dussehra Festival: कोल्हापुरात शाही दसरा थाटात साजरा .पशुपालकांची भूमिका :हौशी आणि जागरूक पशुपालक हा पशुधन केंद्रीत अर्थव्यवस्थेस चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. पशुपालक समाजाच्या भटक्या जीवनशैलीमुळे शुद्ध पशुधन जातींचा प्रसार आणि त्यायोगे संकरीकरण घडलेले आहे. वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या पशुधनावरून एखाद्या भूभागाची प्रसिद्धी आणि ओळख ही त्या भागातील पशुपालकांसाठी अभिमानाचा विषय आहे. सहकार भावनेतून संबंधित पशुधनाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न लोकाश्रयाच्या माध्यमातून झाले आहेत..पशुपालकांना रोजगार, माहितीचे प्रसारण तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय किंवा बिगर शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक मदत यादृष्टीने ‘ब्रीड सोसायटी’ उपयुक्त पर्याय आहे. म्हणून पशुपालकांनी प्रगणकांना आपली कौटुंबिक माहिती, पशुधनाची माहिती अचूकपणे द्यावी. आपण दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारावर भविष्यकालीन धोरण, योजना आणि आर्थिक तरतूद अवलंबून असल्याने सर्व्हेक्षण करणाऱ्या प्रगणकांना माहिती देण्यास संकोच करू नये. कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील याबाबत अवगत करावे..Vijayadashami Festival : विजयादशमीच्या दिवशी काय करु नये?.अनेकदा पशुपालक माहिती देण्यास टाळाटाळ करतात, चुकीची माहिती देतात किंवा नकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. आपल्या गोठ्यापर्यंत पोहोचणारे प्रगणक किंवा सर्व्हेक्षण कर्मचारी हे आपल्या अडचणी शासन पातळीवर सोडविण्यास महत्त्वाचे दुवा म्हणून काम करीत असतात. एखाद्या समस्येचे निराकरण तत्काळ होणे शक्य नसते, मात्र त्याची माहिती अशा सर्व्हेक्षण माध्यमातून धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचू शकते, म्हणूनच कौटुंबिक आणि पशुधनाची वास्तव माहिती द्यावी..पैदास व्यवस्थापनातून गोवंश सुधारणा :१) अधिकाधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी पशुपालनात विविध पातळ्यांवर सुधारणा करावी लागणार आहे. यामध्ये व्यवस्थापन, आनुवंशिकता, पोषण, आरोग्य, उत्पादन निर्मिती प्रक्रिया अशा प्रमुख बाबींचा समावेश होतो. यातील आनुवंशिक पातळीवरील सुधारणा ही सुजाण पशुपालकांसाठी महत्त्वाची ठरते. कारण आनुवंशिक सुधारणा ही पशुधनाच्या जनुकीय पातळीवर होत असून कायमस्वरूपी राहते. एका पिढीत झालेली सुधारणा आनुवंशिकतेने पुढल्या पिढीत हस्तांतरित होत असते. वासरांचे जन्मदाते असलेल्या गायी, वळू यांचेच गुणधर्म त्या वासरात उतरतात..Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली.२) आपल्या पशुधनाचे जे काही गुणधर्म आहेत, जसे दूध उत्पादन, मांस उत्पादन, कार्यशक्ती इत्यादी नियंत्रित करण्याचे काम शरीरातील अतिसूक्ष्म अशी जनुके करीत असतात. प्रत्येक जातीचे गुणवैशिष्टे त्यांच्यातील विविध जनुके नियंत्रित करीत असतात. आनुवंशिक पातळीवर सुधारणा करण्यासाठी विशिष्ट गुणधर्मधारक जनावरांचा संकर करून किंवा एखाद्या जातिवंत जनावरांचा उत्पादनक्षमतेचा विकास करण्यासाठी त्या जातिवंत जनावरांना निवड पैदास पद्धतीचा अवलंब केल्यास तयार होणारी पिढी आपल्याला पाहिजे त्या उत्पादनक्षमता धारक गुणधर्मांनी संपन्न असेल. म्हणजे गवळाऊ गायीची गवळाऊ वळूसह झालेली पैदास ही निवड पैदास होय..३) जी जनावरे गावठी/ गावरान किंवा शास्त्रीय भाषेत अवर्णीत या गटात मोडतात, ज्यांच्यातील गुणधर्म कुठल्याच जातिवंत जनावरांशी जुळून येत नाहीत. त्याचबरोबर उत्पादनक्षमता सुद्धा खालावलेली असते, अशा गटातील जनावरांसह उत्पादनक्षमता अधिक असलेल्या जनावरांचा संकर घडविणे म्हणजे पत सुधारणा ही पद्धत अवलंबिली जाते. पत सुधारणा पद्धतीत गावठी पशुधनाचा इतर वर्णीत/ प्रस्थापित जातींच्या गोवंशासोबत संकर केला जातो, जेणेकरून पुढील पिढीत वर्णीत/ प्रस्थापित जातीच्या गोवंशाचे अर्धे गुणधर्म आढळतील. कृत्रिम रेतनासाठी सिद्ध वळूच्या रेतमात्रा शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत..Fruit Festival : फळ महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळतेय हक्काची बाजारपेठ.गोपालनातून रोजगाराच्या संधी :१) सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत, जे सकल राष्ट्रीय उत्पन्नात ३० टक्क्यांहून अधिक योगदान देतात. या उद्योगांचा निर्यातीत मोठा वाटा आहे. हे उद्योग रोजगाराचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. दूध व्यवसाय करू पाहणारे नवयुवक आणि उद्योजकांसाठी गोपालन हा हुकमी मार्ग आहे. महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार पशुधन क्षेत्र ४.५ टक्के वार्षिक वृद्धिदर दर्शवीत असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी संलग्न क्षेत्राचा १२ टक्के हिस्सा आहे..२) दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग ग्रामीण युवकांच्यासाठी मोठ्या संधीचे क्षेत्र आहे. गीर, साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर या दुधाळ जाती प्रसिद्ध आहेत.वाढत्या लोकसंख्येस कायमस्वरूपी अन्न सुरक्षितता आवश्यक आहे. गेल्या काही दशकांपासून जमिनीचा घटता कस, बदलते हवामान, सिंचनाची अनुपलब्धता, रासायनिक खतांचा वापर, शेती करणाऱ्यांच्या संख्येत घट इत्यादी अनेक कारणांनी शेतीतून उत्पादित अन्नधान्य आणि पर्यायाने प्रथिनांच्या स्रोतास मर्यादा आहेत. अशा वेळी दूध हे प्रमुख अन्न घटक आणि प्रथिनांचा स्वस्त स्रोत म्हणून नजरेसमोर येतो..संपर्क ःडॉ.प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९(डॉ. प्रवीण बनकर हे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.डॉ. स्नेहल पाटील अकोला पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.