Pune News: देशात यंदा पावसामुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बियाण्यांचे सोयाबीन चांगलाच भाव खात आहे. सोयाबीनचा सरासरी भाव हमीभावापेक्षा किमान एक हजाराने कमी असताना बियाणे दर्जाचे सोयाबीन मात्र प्रति क्विंटल ६ हजारांपासून ते ८ हजारांपर्यंत विकले जात आहे. बियाणे कंपन्यांकडून आक्रमक खरेदी सुरु असल्याचे व्यापारी सांगत आहेत..देशात यंदा सोयाबीन पिकाला पावसाने चांगलाच दणका दिला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादन कमी झाले आहे. त्यातही शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान तर झालेच शिवाय सोयाबीनची गुणवत्ताही कमी झाली..Soybean Rate : अकोला, वाशीममध्ये सोयाबीनमध्ये तेजी का आली?.अगदी सोयाबीन काढणीनंतरही काही भागात पाऊस झाला. राजस्थानमध्ये उत्पादकता यंदा सर्वाधिक कमी झाल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. काढणीच्या टप्प्यात नुकसान झाल्याने बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये गुणवत्तेचा माल कमी आहे..ही परिस्थिती देशभरात असल्याने बियाणे कंपन्या खरेदीसाठी बाजारात उतरल्या आहेत. राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्या खरेदी करत आहेत. विदर्भातील काही भागात सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे. या भागात कंपन्यांची खरेदी जोरात सुरू आहे. त्यामुळे बियाण्याच्या सोयाबीनचे दर चांगलेच वाढले आहेत..Soybean Rate: मध्य प्रदेशात सोयाबीनला १३०० रुपये भाव फरक.बियाणे टंचाईदेशात सोयाबीनची लागवड सरासरी ११० ते १२० लाख हेक्टरच्या दरम्यान होत असते. या क्षेत्रावर पेरणीसाठी ११ लाख ते १४ लाख टन सोयाबीन बियाण्यांची गरज असते. देशात कमी झालेली लागवड आणि खराब गुणवत्ता यामुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनचा पुरवठा कमी दिसत आहे.....असा आहे भावबियाण्याच्या सोयाबीनचे भाव अकोला, वाशीम, कारंजा, जालना, दर्यापूर, मंगरूळपीर तसेच मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये ६ हजारांच्या पुढे आहेत. अकोला आणि वाशीम बाजारात भाव ७ हजार ते ८ हजारांच्याही दरम्यान पोहोचले आहेत. पण या बाजारांमध्ये सरसकट सोयाबीनला हा भाव मिळत नाही. बियाणे दर्जाचा माल वगळता इतर सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या आसपास सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.