Weather Impact: उन्हाचा तीव्रतेने वाढता पारा आणि अपुरा पाऊस यामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटला असून सध्या केवळ ३१ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत..जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये मागील आठवड्यापर्यंत सुमारे ४०.४८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. मात्र, सध्या तो घटून ३९.०१ दलघमी इतकाच राहिला आहे. म्हणजेच सरासरी १.४७ दलघमी साठ्याची घट झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बाष्पीभवन वाढल्याने पाणीसाठ्यात ही घट होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. .Water Levels Drop: महाड तालुक्यात जलसाठा तळाला.संबंधित विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी चुलबंद, नांगाझर, कडंग, शेंगाव, बोदलकसा, कापसी, घोडाझरी, चोरखमारा आणि संजय सरोवर या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ४० टक्क्यांच्या आत आला आहे. त्यात काही प्रकल्पांतील साठा तर २० ते ३० टक्क्यांच्या दरम्यान घसरला आहे. .Dam Water Level: राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशी धरणांत पुरेसा साठा .विशेष म्हणजे चोरखमारा आणि संजय सरोवर) हे प्रकल्प ‘ऑक्सिजनवर’ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. चोरखमारा प्रकल्पात केवळ १६.४९ टक्के, तर संजय सरोवर प्रकल्पात १२.७० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हे प्रकल्प कोरडे पडण्याची भीती व्यक्त होत आहे..काटकसरीचे आवाहनउन्हाळा अद्याप शिगेला पोहोचायचा असून मे-जून महिन्यात पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे. त्यातच पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.